मंत्री थोरात यांच्या भगिणी दुर्गा तांबे यांचा दिवाळीनिमित्त हा अभिनव उपक्रम - This is an innovative initiative of Minister Thorat's sister Durga Tambe on the occasion of Diwali | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

मंत्री थोरात यांच्या भगिणी दुर्गा तांबे यांचा दिवाळीनिमित्त हा अभिनव उपक्रम

आनंद गायकवाड
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

भारतीय सैनिक हे कायम आपल्या परिवारापासुन हजारो किलोमीटर दूर असतात. सणाच्या काळातही ते घरी येत नाहीत. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण असतानाही हे सैनिक आपल्या जनतेसाठी कामावर असतात.

संगमनेर : प्रगतशील असलेल्या संगमनेर तालुक्याने कायम राज्याला दिशादर्शक काम केले आहे. यावर्षी आपले घरदार सोडून देशवासीयांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असलेल्या भारतीय सैनिकांना जयहिंद महिला मंच, स्वराज्य सैनिक कल्याण संस्था यांच्या वतीने आजी - माजी सैनिक व त्यांच्या परिवारासाठी दिवाळीचे फराळ भेट देण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना जवानांना मिठाई भेट देवयाची आहे, त्यांनी उच्च प्रतिची पॅकिंग स्वरुपातील मिठाई यशोधन कार्यालयात जमा करावी, असे आवाहन `जयहिंद`च्या अध्यक्षा दुर्गा तांबे यांनी केले आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दुर्गा तांबे या भगिणी आहेत. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देत स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तालुक्यात सहकाराचे मोठे जाळे निर्माण केले. थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा सहकार, शिक्षण, व्यापार आदी क्षेत्रात राज्यात अग्रगण्य ठरला आहे. पुरोगामी व समतेचा विचार जोपासत अनेक उपक्रम संगमनेरमध्ये सातत्याने राबवले जात आहेत. जिल्ह्यात सांस्कृतिक, वैभवशाली शहर ठरलेल्या संगमनेर तालुक्यात दुर्गा तांबे यांच्या पुढाकारातून मागील पाच वर्षांपासून दिवाळीनिमित्त जयहिंद महिला मंच, राजमाता जिजाऊ महिला मंडळ, एकवीरा फाऊंडेशन, माऊली संस्था यांच्या वतीने भारतीय सैनिकांना फराळ देण्यात येत आहे.

भारतीय सैनिक हे कायम आपल्या परिवारापासुन हजारो किलोमीटर दूर असतात. सणाच्या काळातही ते घरी येत नाहीत. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण असतानाही हे सैनिक आपल्या जनतेसाठी कामावर असतात. रात्रंदिवस ऊन, वारा, पाऊस ते डोक्यावर घेऊन आपले कर्तव्य पार पाडत असतात. त्यांच्या प्रति आदर भावना व्यक्त करताना या नागरिकांना सैनिकांना फराळ भेट द्यावयाची आहे, त्यांनी यशोधन कार्यालयात फराळ पॅकिंग पोहच करावी. ही मिठाई आजी - माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना भेट दिली जाणार आहे.

दरम्यान, समाजातील मदतीतून फराळाच्या मदत जमा केली जाणार असून, सैनिकांप्रती आदर निर्माण व्हावा, आपल्या आनंदात सैनिकांच्या कुटुंबियांनाही सहभागी करून घेण्यासाठी अशा पद्धतीचा उपक्रम राबविला आहे. अनेकदा सैनिक देशसेवेत असताना आपल्या परिवारापासून खूप दूर असतात. अशा वेळी घरात दिवाळी उत्साहात व्हावी, आपल्याप्रमाणेच त्यांच्या कुटुंबयांतही आनंद रहावा, यासाठी अशा पद्धतीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याला नागरिकांमधूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात मिठाई जमा करून ती सैनिकांना दिली जाणार आहे.

Edited By - Murlidhar Karale

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख