नगर : भारतीय जनता भाजपा युवा मोर्चाच्या नगर (दक्षिण ) जिल्हा कार्यकरणी आज जिल्हाअध्यक्ष अरुण मुंढे यांनी पुन्हा जाहीर केली. मागील काही महिन्यांपूर्वी ही कार्यकारीणी जाहीर झाली होती. मात्र तिला स्थगिती देण्यात आली होती. आता पुन्हा नव्याने जाहीर करताना पुन्हा सर्व त्याच चेहऱ्यांना संधी दिली, मग स्थगिती का दिली होती व ती उठवून रुसवा कोणाचा काढला, असाच सूर कार्यकर्त्यांमध्ये उमटला आहे.
प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी खासदार दिलीप गांधी, माजी आमदार चंद्रशेखर कदम, प्रा भानुदास बेरड आदींच्या सुचनेप्रमाणे व मार्गदर्शनाखाली ही युवा मोर्चाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असल्याचे अरुण मुंढे यांनी म्हटले आहे.
यापूर्वी हीच कार्यकारीणी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर काही नेत्यांना विश्वासात न घेतल्याने ते रुसले होेते व आता त्यांची नाराजी काढल्यामुळे पुन्हा तीच कार्यकारिणी जाहीर केल्याचे सांगितले जाते.
जिल्हा कार्यकारणी खालिलप्रमाणे
जिल्हाध्यक्षपदी सत्यजित कदम यांची निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी शिवाजी बेरड, अमोल सदाशिव शेलार, तुषार अनिल पवार, उमेश भालसिंग, महेंद्र तांबे, धनंजय मोरे, अमोल गर्जे, संजय कार्ले यांची निवड करण्यात आली आहे.
सरचिटणीसपदी अक्षय कर्डीले व गणेश कराड यांची निवड करण्यात आली, तर चिटणीसपदी अनिल गदादे, उदय पवार, सचिन पालवे, राजकुमार लोखंडे, दत्तप्रसाद मुंदडा, अभिजित रोहकले, मछिंद्र बर्वे, अभिजित जवादे यांचीच निवड करण्यात आली आहे. प्रसिद्धीप्रमुख - राहुल लांडे, खजिनदार -विवेक बेरड यांची निवड करण्यात आली.
जिल्हा कार्यकारणी सदस्य खालीलप्रमाणे
गणेश झावरे, भाऊसाहेब खुळे, प्रभाकर जाधव, विकास काळे, सागर कल्हापुरे, निलेशकुमार दरेकर, योगेश कासार, संजय कदम, ईश्वर मुरुमकर, हरिभाऊ वायकर, विक्रमसिह जाधव, सोमनाथ वाखारे, गोपिनाथ जगताप, अमोल बावडकर, उदय शिंदे, सोमनाथ अकोलकर, राहुल बंब, पांडुरंग मोरे आदींचा जिल्हा कार्यकारणीत समावेश करण्यात आला.
ती कार्यकारीणी नियमबाह्य होती : अरुण मुंढे
यापूर्वी जाहीर झालेली कार्यकारीणी नियमबाह्य होती. कार्यकारीणी पक्षाच्या नियमानुसारच हवी, त्यासाठी त्या वेळी या कार्यकारिणीला स्थगिती दिली होती. त्यातील पदाधिकारी पूर्वीचेच आहेत. आता फक्त नव्याने पदरचना करून त्यात थोडासा बदल करून जाहीर करण्यात आली आहे. पदाधिकारी निवडीला कोणाचाही विरोध नाही, मात्र ती नव्याने नियमात करण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.

