तहसीलदार मॅडम, तुम्ही टिटवीचे मटण खाता काय? - Tehsildar in Parner - Complaints of employees | Politics Marathi News - Sarkarnama

तहसीलदार मॅडम, तुम्ही टिटवीचे मटण खाता काय?

मार्तंड बुचुडे
मंगळवार, 19 मे 2020

तलाठी व कर्मचाऱ्यांनी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. तर तलाठी व कर्मचारी मुख्यालयी न राहता कामचुकारपणा करतात अशी तक्रार देवरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविली आहे.

पारनेर : ``तहसीलदार मॅडम, तु्म्ही टिटवीचे मटण खाता काय, असा प्रश्न पारनेर तालुका तलाठी संघटनेचे कार्याध्यक्ष विनायक निंबाळकर यांनी मला जमावासमोर विचारला,`` असा आरोप पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना पाठविलेल्या तक्रारीत त्यांनी तसा उल्लेख केला आहे.

जिल्ह्यात व राज्यातही कोरोनाची महामारी सुरू आहे. या काळातही निघोजचे तलाठी मुख्यालयी राहात नाहीत. कामात दिरंगाई करतात. निवारा केंद्राच्या नावाखाली घेतलेल्या देणग्या रोख स्वरूपात स्वीकराल्या आहेत. त्याचा हिशोब देत नाहीत. संघटनेचा दबाव आणून तुमची आम्ही बदली करणार आहोत, असे म्हणत जमावात माझा आपमान केला, असल्याची तक्रार निघोजचे तलाठी विनायक निंबाळकर करीत आहेत. त्यामुळे त्यांचे निलंबीत करावे, अशी मागणी तहसीलदार ज्योती देवरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर महसूल कर्मचारी व कामगार तलाठी यांना मुख्यालयी राहाण्याची सक्ती केल्याने व काही कर्मचाऱ्यांनी कामात कुचराई केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना विचारणा केल्याने कर्मचारी संघटणा दबाव गट निर्माण करूण माझ्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देत आहे. निघोज येथील तलाठी निंबाळकर तसेच इतरही महसूल कर्माचारी व कामगार तलाठी यांनी मुख्यालयी थांबावे व कामात दिरंगाई करू नये, असे सांगीतल्याने संघटणेच्या पदाधिकाऱ्यांना माझा राग येत आहे. त्यामुळे संघटणेचे काही पदाधिकारी पदाचा गैरवापर करत माझ्या विरोधात आवाज उठवत आहेत, अशी तक्रार देवरे यांनी केली आहे. 

तहसीलदार निलंबनाची धमकी देतात

आमच्या वयाचा व पदाचा कोणताही विचार न करता तहसीलदार ज्योती देवरे आपमानास्पद वागणूक देतात. तसेच मनमानी कारभार करत चौकशीच्या नावाखाली निलंबनाची धमकी देत आहेत. त्या विरोधात कामबंद किंवा असहकार आंदोलन करण्याचा इशारा महसूल कर्मचारी व कामगार तलाठ्यांनी लेखी निवेदनाद्वारे मेलवर मुख्यमंत्री, महसtलमंत्री व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दिला आहे.

निवेदनावर कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह  मंडलाधिकारी व कामगार तलाठी अशा 45 कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत. तहसीलदार चौकशीच्या नावाखाली मानसिक त्रास देतात ,असाही आरोप केला आहे.  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडलाधिकारी, कामगार तलाठी प्रामाणिक काम करत आहेत. परंतु तहसीलदार अपमानास्पद वागणूक देतात. कर्मचारांना सुरक्षा उपाययोजनांसाठी निधी उपलब्ध असताना कोणत्याही प्रकारचे मास्क अथवा सॅनिटायझर उपलब्ध करून दिले नाही. तालुक्यातील निवाराकेंद्र मंडलाधिकारी व कामगार तलाठी यांनी आपल्या पगारातून चालविली आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही, असाही आरोप निवेदनात केला आहे.

रंगतेय तक्रारींची जुगलबंदी

दरम्यान, तहसीलदार ज्योती देवरे या कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देतात. तलाठी तसेच महसूल कर्मचाऱ्यांना चाैकशीच्या नावाखाली निलंबनाची धमकी देतात, असे कारण सांगून तलाठी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. तर हे तलाठी व कर्मचारी मुख्यालयी न राहता कामचुकारपणा करतात, हिशोब न देता उलट माझीच बदनामी करतात, अशी तक्रार देवरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविली आहे. त्यामुळे पारनेरकरांना तहसीलदार व कर्मचाऱ्यांची जुगलबंदी सध्या पाहण्यास मिळत आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख