मी राष्ट्रवादीत जाणार ही अफवा पसरविणारे प्राजक्त तनपुरेच - It is Prajakta Tanpur who is spreading rumors that I will join NCP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

मी राष्ट्रवादीत जाणार ही अफवा पसरविणारे प्राजक्त तनपुरेच

मुरलीधर कराळे
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

प्रसाद तनपुरे व ऊषा तनपुरे या दाम्पत्यांनी शिवसेनेत प्रवेश करून 2014 मध्ये माझ्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेना सोडल्याची दिसत नाही.

नगर : ``मी अजिबात भाजप सोडणार नाही. मी राष्ट्रवादीत जाण्याची अफवा मंत्री तनपुरे हेच पसरवितात. जिल्ह्यातील भाजपचे नेते राष्ट्रवादीत जाणार, असे ते म्हणतात, पण नाव कोणाचेच सांगत नाहीत. याचाच अर्थ त्यांचे आई-वडील शिवसेनेत होते. ते अद्यापही शिवसेनेतच असावेत. त्यांनाच राष्ट्रवादीत यायचे असेल, त्यामुळेच मंत्री तनपुरे यांना नाव सांगता येत नाहीत, असा खोचक टोला माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांना लगावला. `सरकारनामा`शी बोलताना कर्डिले यांनी याबाबत स्पष्टीकरण केले.

ते म्हणाले, तनपुरे दाम्पत्यांनी (प्रसाद तनपुरे व डाॅ. ऊषा तनपुरे) शिवसेनेत प्रवेश करून 2014 मध्ये माझ्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेना सोडल्याची दिसत नाही. कोठीही त्यांचे राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचा फोटो दिसला नाही, की बातमी आली नाही. त्यामुळे तेच अद्याप शिवसेनेत असावेत. त्यांचे पूत्र मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढविली. ते मंत्री झाले. परंतु आई-वडील मात्र शिवसेनेत असावेत. त्यांनाच शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करायचा असेल, त्यामुळेच मंत्री तनपुरे असे बोलत असावेत. सत्तेत मित्र पक्ष असल्याने त्यांना शिवसेनेचे थेट नाव घेता येत नाही, म्हणून ते भाजपचे नाव घेऊन काही नेते राष्ट्रवादीत येणार असल्याचे सांगतात, असा टोला कर्डिले यांनी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना लगावला.

सत्ताधारी असूनही आंदोलनाची भाषा कशासाठी

ज्यांचा मुलगा सत्तेत मंत्री आहे, ते प्रसाद तनपुरे आंदोलनाची भाषा करतात. नगर-मनमाड रस्त्यासाठी त्यांनी आंदोलनाची भाषा केली होती. राहुरी डेपोसाठीही आंदोलन करणार, असे त्यांनी म्हटले होते. याचाच अर्थ ते अद्यापही शिवसेनेतच आहेत. त्यांची तेथेही अडचण होत असेल. त्यामुळेच सरकारच्या विरोधात म्हणजेच शिवसेनेच्या विरोधात आंदोलने करण्याची भाषा वापरतात. आपला मुलगा राष्ट्रवादीत मंत्री असताना एक प्रकारे मुलाच्याच विरोधात आंदोलनाची भाषा करतात, याचा अर्थ काय समजायचा, असा प्रश्न कर्डिले यांनी उपस्थित केला आहे.

मुलाला वडिलांचा त्रास होत असेल

मंत्री तनपुरे यांना शिवसेनेत असलेल्या आई- वडिलांचाच त्रास होत असेल. त्यांची अडचण अशी आहे, की आई-वडील शिवसेनेत गेले होते. ते अद्यापही शिवसेनेतच असावेत. ते दोघे शिवसेनेत आणि पुत्र राष्ट्रवादीत, यामुळेच मुलाला आई-वडिलांचा त्रास होत असेल. आता त्यांना राष्ट्रवादीत घ्यायचे असेल. त्यामुळेच मंत्री तनपुरे असे बोलत असतील, असे सांगून कर्डिले यांनी मंत्री तनपुरे यांना चिमटा काढला.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख