ग्रामपंचायतींवर वर्चस्वासाठी आमदार पवार व राम शिंदे यांच्या गटात स्पर्धा

जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या पक्षाकडे खेचण्यात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या गटातस्पर्धा निर्माण झाली आहे.
ram shinde and rohit pawar.jpg
ram shinde and rohit pawar.jpg

कर्जत : तालुक्यातील 56 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आणि ऐन हिवाळ्यात या गावातील वातावरण गरम झाले आहे. विविध राजकीय पक्षाच्या गाव पातळीवरील सर्व नेत्यांनी या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या पक्षाकडे खेचण्यात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या गटात स्पर्धा निर्माण झाली आहे. 

राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कालावधी कमी केल्यामुळे नेते व इच्छुकांची धावपळ उडाली आहे. तसेच निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने अनेकांची कोंडी झाली आहे. तसेच केलेली पूर्वतयारी धुळीस मिळाली आहे. तालुक्यातील 56 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यावर गावकीच्या राजकारणाची रणधुमाळी सुरू झाली आहे.

कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघात राजकीय बदल झाला असून, कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांचे कार्यकर्ते प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष या निवडणुकीच्या निमित्ताने समोरासमोर उभे ठाकणार आहेत.

तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग राबविला जाणार का? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. सरपंचपदाचे आरक्षण लांबणीवर पडल्याने अनेकांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. सरपंचपदाचा `सस्पेन्स` कायम राहिल्यामुळे निवडणुकीत रंगत वाढली आहे.

ग्रामीण भागात ग्रामपंचायत ताब्यात असणे, ही तालुक्यातील मोठी राजकीय प्रतीष्ठा मानली जाते. तसेच गावचे सरपंचपद हे मानाचे. अलीकडच्या काळात सर्वात जास्त निधी ग्रामपंचायतींकडेच असल्याने सरपंच पदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे.

या 56 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार

मिरजगाव, निमगांव गांगर्डे, चापडगाव, कोंभळी, चिलवडी, थेरवडी, दुरगांव, बेनवडी, भांबोरा, बारडगांव दगडी, बारडगाव सुद्रिक, जलालपुर, पिंपळवाडी, टाकळी खंडेश्वरी, पाटेगाव, मलठण, निमगांव डाकू, चिंचोली काळदात, डिकसळ, नांदगाव, वालवड, मांदळी, कोकणगांव, बेलगांव, गुरवपिंपरी, रवळगाव, वडगाव तनपुरे, करपडी आखोणी, शिंपोरा, दुधोडी, सिदधटेक, राक्षसवाडी खुर्द, राक्षसवाडी बुद्रुक, तळवडी, धालवडी, नागापूर, बाभूळगांव खालसा, तरडगाव, पाटेवाडी, दिघी, खंडाळा, खांडवी, चांदे बुद्रूक, चांदे खुर्द, चिंचोली रमजान, थेरगाव नागमठाण, भोसे, रूईगव्हाण, सुपे, तिखी, नागलवाडी, रातंजण, घुमरी, रेहकुरी.
 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com