This is a big decision of Riteish and Genelia Deshmukh on the occasion of 'Doctor's Day'! | Sarkarnama

`डाॅक्टर डे` निमित्त रितेश आणि जेनेलिया देशमुख यांचा हा मोठा निर्णय !

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 2 जुलै 2020

जेनेलियाने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये दोघांनीही आपल्या या निर्णयाबाबत सांगितलं आहे.

लातूर : डाॅक्टर दिनाचे आैचित्य साधून अभिनेता रितेश विलासराव देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया रितेश देशमुख या दोघांनीही मोठा निर्णय घेतला आहे. रितेश आणि जेनेलिया दोघंही अवयवदान करणार आहेत. डॉक्टर दिनाचं औचित्य साधत त्यांनी हा महत्त्वाचा असा निर्णय घेतला आहे.

जेनेलियाने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये दोघांनीही आपल्या या निर्णयाबाबत सांगितलं आहे. दोघांनीही आपले अवयव दान करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. या पोस्टमध्ये जेनेलियाने म्हटलं आहे, “रितेश आणि मी फार आधीपासून अवयवदानाचा विचार करत होतो. मात्र आज डॉक्टर दिनाचं औचित्य साधत आम्ही आमचे अवयव दान करण्याचा निर्णय घेत आहोत”

“हा निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल आम्ही डॉ. नोझर शेरिअर आणि FOGSI चे आभार मानतो. एखाद्याला सर्वोत्तम भेट द्यायची असेल, तर जीवनदान हीच भेट सर्वोत्तम असू शकते, असं दोघंही म्हणालेत. शिवाय “तुम्हीदेखील पुढाकार घ्या आणि आयुष्य वाचवण्यासाछी प्रतिज्ञा करा, तुमचे अवयवदान करण्याची शपथ घ्या”, असं आवाहनही दोघांनी केलं आहे.
 
एखाद्या रुग्णाच्या शरीरातील अवयव निकामी झाल्यानंतर त्याजागी दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरातील अवयव प्रत्यारोपित करता येतात. यासाठी मोठ्या प्रमाणात अवयवदान करणं गरजेचं आहे. किडनी, यकृत असे काही अवयव जिवंतपणी दान करता येतात. तर शरीरातील इतर अवयव एखादी व्यक्ती ब्रेनडेड होते तेव्हा दान करता येतात. अवयवदाना मुळे एखाद्या व्यक्तीला नवं आयुष्य जगण्याची संधी मिळते, त्यामुळेच अवयवदान म्हणजे जीवनदानच आहे.

देशमुख दाम्पत्याच्या या निर्णयाचे त्यांच्या हजारो चाहत्यांनी काैतुक केले आहे. त्यांचा आदर्श घेत समाजातील इतर युवकही अशा पद्धतीचा निर्णय घेवू शकतील. दोघेही अभिनेते असल्याने त्यांच्या या निर्णयामुळे सकारात्मक संदेश समाजात जात आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख