लडाखवरील खोडसाळ नकाशाबद्दल ट्‌विटरचा लेखी माफीनामा - Twitter's written apology for a rough map of Ladakh | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

लडाखवरील खोडसाळ नकाशाबद्दल ट्‌विटरचा लेखी माफीनामा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

ट्‌विटरने मागील महिन्यात या प्रकाराबद्दल तोंडी माफी मागितली होती, मात्र संसदिय समितीने त्यांचा माफी प्रस्ताव फेटाळून, भारताची लेखी माफी मागा व तसे रितरसर प्रतिज्ञापत्र द्या, असे बजावले होते.

नवी दिल्ली : केंद्रशासित प्रदेश लडाखला चीनचा भाग दाखविणारा नकाशा प्रसिध्द केल्याबद्दल ट्‌विटरने संयुक्त संसदीय समितीसमोर लेखी स्वरूपात माफी मागितली आहे. या महिनाअखेरपर्यंत ही चूक दुरूस्त केली जाईल, असेही ट्‌विटरने म्हटल्याची माहिती समितीच्या अध्यक्षा, खासदार मीनाक्षी लेखी यांनी आज सांगितले.

ट्‌विटरने मागील महिन्यात या प्रकाराबद्दल तोंडी माफी मागितली होती, मात्र संसदिय समितीने त्यांचा माफी प्रस्ताव फेटाळून, भारताची लेखी माफी मागा व तसे रितरसर प्रतिज्ञापत्र द्या, असे बजावले होते.

केंद्राच्या डेटा संरक्षण विधेयकावरून माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या या संसदीय समितीसमोर हजर रहाण्यास ट्‌विटरने यापूर्वी नाकारले होते. त्यावरूनही लेखी यांनी संताप व्यक्त करून हे भारतीय संसदेच्या विशेषाधिकारांचे उल्लंघन असल्याचे म्हटले होते. त्यापाठोपाठ ट्‌विटरने आपल्या नकाशात लडाखला चीनचा भाग दाखविले होते. त्यानंतर संसदीय समितीने ट्‌विटरला या गंभीर चुकीबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

भारतीय घटनेनुसार हा प्रकार देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली मोडतो त्यामुळे ट्‌विटरने लेखी प्रतितज्ञापत्राद्वारे खुलासा करावा, असेही समितीने बजावले होते. देशाच्या एकतेवर प्रश्‍नचिन्ह किंवा संशय निर्माण होईल, अशी ही गंभीर चूक आहे व याबद्दल इंक यांनीच स्पष्टीकरण दिले पाहिजे.

ट्‌विटर इंडियाच्या विपणन प्रमुखांनी नव्हे असे लेखी यांनी म्हटले होते. त्यावर ट्‌विटरचे प्रमुख ट्‌विंटर इंक यांच्यावतीने कंपनीचे प्रायव्हसी अधिकारी डेमियन कॅरीयन यांनी समितीला नुकत्याच लिहिलेल्या पत्रात या चुकीबद्दल बिनशर्त माफी मागितली आहे, असे लेखी यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, की यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्याची कबुलीही दिली असून, 30 नोव्हेंबरपर्यंत ही चूक सुधारण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. भारत सरकारनेही ट्‌विटर इंडियाला त्यांचा चुकीचा नकाशा तातडीने सुधारा, अशी नोटीस पाठविली आहे.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख