मावळातील `वाझे`ला जनतेने दीड वर्षांपूर्वी घरी बसवलयं : आमदार शेळके - People settled 'Waze' in Mavla a year and a half ago: MLA Shelke | Politics Marathi News - Sarkarnama

मावळातील `वाझे`ला जनतेने दीड वर्षांपूर्वी घरी बसवलयं : आमदार शेळके

सरकारनामा ब्युरो
रविवार, 6 जून 2021

महाविकास आघाडी चांगले काम करीत आहे. परंतु काही लोक मुद्दामहून चुकीचे मेसेज पसरवित आहेत. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काही लोक आरोप करतात.

मावळ ः मावळातील वाझे कोण आहे, हे जनतेला माहिती आहे. या वाझेला जनतेने दीड वर्षांपूर्वी मोठ्या मताधिक्याने घरी बसवलयं, असे प्रत्युत्तर आमदार सुनील शेळके यांनी माजी मंत्री बाळा भेगडे (Bala Bhegade) यांच्या आरोपाला दिले. विविध कार्यलयांत जनतेच्या सेवेसाठी माझे कार्यकर्ते उभे असतात, असा दावा त्यांनी केला. (People settled 'Waze' in Mavla a year and a half ago: MLA Shelke)

माध्यमाशी बोलताना आमदार शेळके म्हणाले, की महाविकास आघाडी चांगले काम करीत आहे. परंतु काही लोक मुद्दामहून चुकीचे मेसेज पसरवित आहेत. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काही लोक आरोप करतात. अशा आरोपांचा आम्ही जाहीर निषेध करतो. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जनतेचे प्रश्न सोडवित आहोत. विरोधकांनी आमच्याबाबत आरोप केले. मावळ तालुक्यात सचिन वाझे कोण आहेत, हे जनतेला माहिती आहे. आमचे कार्यकर्ते चांगले काम करतात. शासकीय कार्यालयात योजनांविषयी माहिती देतात. संजय गांधी निराधार योजना असेल, कृषीच्या योजना असतील त्यासाठी कार्यकर्ते लोकांना मदत करीत आहे. भाजपच्या काही नेत्यांना कायम दुसऱ्यावर आरोप करण्याची सवय आहे. भ्रष्ट्राचार त्यांच्याच काळात झाला आहे. कोणाच्या बदल्यासाठी किती पैसे घेतले जातात, हे त्यांनाच माहिती आहे, असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा...

कापड व्यवसायाला ८० कोटींचा फटका

संगमनेर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून म्हणजे सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या संगमनेर शहरातील व्यापारी पेठ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रभावीत झाली. जिल्ह्यात प्रसिध्द असलेल्या संगमनेर शहरातील कापड बाजारपेठेत कडक निर्बंधाच्या काळात सुमारे 80 कोटी रुपयांचा फटका बसल्याचा अंदाज व्यापारीवर्गाने व्यक्त केला आहे.

नगरच्या बरोबरीने खऱ्या अर्थाने ग्राहकाभिमुख बाजारपेठ अशी संगमनेर शहराची ओळख आहे. 1650 च्या सुमारास सुरतेतील काही व्यापारी मंडळी संगमनेरात स्थिरावली. त्यानंतर 1660 च्या सुमारास काही मारवाडी मंडळी संगमनेरमध्ये आली. उपलब्ध माहितीनुसार 1923- 24 साली अवघी 10 हजार लोकसंख्या असलेल्या या शहरात सुमारे तीन हजार हातमाग होते. कापड व्यवसाय़ाची मोठी परंपरा या शहराला लाभली आहे. शहरात लहान मोठी सुमारे 200 दुकाने असून, त्यांची वार्षिक उलाढाल अंदाजे 300 कोटी रुपयांची आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत बसलेल्या आर्थिक फटक्यातून सावरत असतानाच पुन्हा दुसऱ्या लाटेत केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला प्रशासनाने परवानगी दिल्याने कापड दुकानासह इतर व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. कापड दुकानांतून विक्री एप्रिल- मे या लग्नसराईच्या दोन महिन्यांत 25 ते 35 टक्के, दिवाळीच्या दिड महिन्यात 25 टक्के, तर उर्वरित आठ महिन्यात 50 टक्के या प्रमाणे होते.
 

हेही वाचा...

पुन्हा नव्याने न्यायालयीन लढाई

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख