ज्यांच्यासाठी लढतोय, त्यांनाच गांभिर्य नाही ! `स्वाभिमानी`च्या कार्यकर्त्यांने हात टेकले - Only those who are fighting for it are not serious! Swabhimani activists raised their hands | Politics Marathi News - Sarkarnama

ज्यांच्यासाठी लढतोय, त्यांनाच गांभिर्य नाही ! `स्वाभिमानी`च्या कार्यकर्त्यांने हात टेकले

रवींद्र माने
शुक्रवार, 12 मार्च 2021

शेतकरी आंदोलन आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ! हा सद्या दिल्लीतील आंदोलनामुळे देशात चर्चेचा आणि ऐरणीवर आलेला विषय आहे.

तासगाव : दूध दर वाढ मिळावी म्हणून ज्यांच्यासाठी करतोय त्यांनाच गांभीर्य नसल्याने आज करण्यात येणारा रास्ता रोको रद्द करत असल्याचा स्वाभिमानी संघटनेचे तालुका अध्यक्ष जोतीराम जाधव यांनी पोलिसात दिलेला जबाब व्हायरल झाले आहे. एक लढणाऱ्या कार्यकर्त्याचा "उद्विग्न सवाल" या निमित्ताने समोर आला आहे.

शेतकरी आंदोलन आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ! हा सद्या दिल्लीतील आंदोलनामुळे देशात चर्चेचा आणि ऐरणीवर आलेला विषय आहे. या पार्श्वभूमीवरच एका वेगळ्या विषयामुळे, गायीच्या दुधाला 31 रुपयांवर दर मिळावा, म्हणून होणारे रास्तारोको आंदोलन चर्चेत आले आहे.

हेही वाचा... विखे पाटलांच्या तक्रारीमुळे पिकविम्याबाबत घोषणा

हे आंदोलन रद्द झाले, पण ते रद्द होण्यामागील कारण मन उद्विग्न करणारे आहे. आंदोलन रद्द का झाले ? याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष जोतीराम जाधव यांनी पोलीस जबाबात ज्यांच्यासाठी आंदोलन करायचे ते शेतकरीच गंभीर नाहीत आणि तालुक्यातून एकही शेतकरी आला नाही म्हणून आंदोलन मागे घेत आहे, असे म्हटले आहे.

ज्यांच्यासाठी लढायचे, अंगावर खटले घ्यायचे, मात्र त्या आंदोलनात तेच सहभागी होत नसतील तर ? हे वास्तव यामुळे समोर आले आहे. विशेष म्हणजे जोतीराम जाधव यांचा हा पोलिसातील जबाब समाजमाध्यमातून व्हायरल होतो आहे.

हे वास्तव यापूर्वी अनेकदा समोर आले आहे, विशेषतः खऱ्या शेतकरी प्रश्नाबाबत तासगाव तालुक्यातील शेतकरी समोर येतच नाहीत, दूध दरवाढ असो,वा द्राक्षातील होणारी फसवणूक असो, वा बेदाणा दराचे आंदोलन असो, शेतकरी लढण्यासाठी बाहेर पडत नसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा... पवारांना दिले खरमरीत उत्तर

आंदोलनात सहभागी न होण्याची कारणे शोधण्याची आवश्यकता आहे. प्रश्न माझा सोडवावा दुसऱ्याने ! तालुक्याची ही मानसिकता यानिमित्ताने समोर आली आहे. राजकीय आंदोलने वगळता लोक सामाजिक प्रश्नावर एकत्र येत नाहीत, हे पुन्हा एकदा समोर आले आहे
 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख