मावळातील शासकीय कार्यालयांत अनेक `वाझे` : बाळा भेगडे यांचा आरोप - Many 'wazes' in government offices in Mavala: Allegation of former minister Bala Bhegade | Politics Marathi News - Sarkarnama

मावळातील शासकीय कार्यालयांत अनेक `वाझे` : बाळा भेगडे यांचा आरोप

सरकारनामा ब्युरो
रविवार, 6 जून 2021

आमदारांच्या आशिर्वादाने अनेक शासकीय कार्यालयांत भ्रष्टाचार सुरू आहे. त्यांचे कार्यकर्ते तेथे उभे असतात. असे अनेक वाझे तेथे असल्याचा आरोप त्यांनी केला. 

मावळ ः मावळातील शासकीय कार्यालयात भ्रष्ट्राचार सुरू आहे. आमदारांच्या आशिर्वादाने या कार्यालयांमध्ये अनेक वाझे आहेत, असा आरोप माजी मंत्री बाळा भेगडे यांनी आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्यवर केला. (Many 'wazes' in government offices in Mavala: Allegation of former minister Bala Bhegade)

माध्यमाशी बोलताना भेगडे म्हणाले, की आमदारांच्या आशिर्वादाने अनेक शासकीय कार्यालयांत भ्रष्टाचार सुरू आहे. त्यांचे कार्यकर्ते तेथे उभे असतात. असे अनेक वाझे तेथे असल्याचा आरोप त्यांनी केला. 

भेगडे म्हणाले, की गेल्या दीड वर्षाच्या काळात मावळ तालुक्यातील वेगवेगळ्या खात्यातील अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लुटमार करण्याचे काम केले. काही अधिकाऱ्यांवर कारवाईही झाली. भाजपच्या वतीने या भ्रष्ट्र अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध करतो. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत. प्रशासनावर अंकुष नसल्याने जनतेला या परिस्थितीला त्रास सहण करावा लागत आहे. भ्रष्ट्र अधिकारी हटाव, मावळ बचाव, अशी भूमिका घेऊन भाजपचे कार्यकर्ते घेणार आहेत. कारवाया व भ्रष्ट्र अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडणार आहेत. 

राज्याचे माजी गृहमंत्र्यांनी अनिल देशमुख यांनी ज्या पद्धतीने सचिन वाझेला वसुलीचे टार्गेट दिले होते, त्याप्रमाणे मावळ तालुक्यातील कार्यालयात असे किती वाझे उभे केले आहे, हे उघडकीस येत आहेत. या घटनेचा आम्ही निषेध करतो. येणाऱ्या काळात भाजपचा कार्यकर्ता प्रशासनावर अंकुष ठेवण्याचे काम करेल. जरी आमच्या पक्षाचा एखादा कार्यकर्ता संबंधित विषयात लक्षात आला, तर त्याला पक्षातून आम्ही निलंबीत करू. परंतु मावळ तालुक्यातील विकासाला खीळ बसू देणार नाही. तालुक्याचा अपमान होऊ देणार नाही. आगामी काळात अशा अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे काम नक्कीच करू. कायदेविषयक बाजू तपासून योग्य प्रकारचा धडा शिकविण्याचे काम आम्ही करणार आहेत, असे भेगडे यांनी सांगितले.

हेही वाचा..

शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवा

नगर : काँग्रेस पक्षाने कायम गोरगरीब व सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम केले असून, पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी संघटनात्मक पातळीवर चांगले काम करताना शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा कोरोना परिस्थिती, बी -बियाणे उपलब्धता, त्याचे वाटप व इतर प्रश्नांवर आढावा घेतला. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित ऑनलाईन बैठकीत त्यांनी तालुकानिहाय आढावा घेतला. यावेळी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार लहू कानडे ,जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राजेंद्र दादा नागवडे ,करण ससाने ,सचिन गुजर ,उत्कर्षा रुपवते आदी उपस्थित होते.

 

 

हेही वाचा...

पुन्हा नव्याने न्यायालयीन लढाई

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख