पुण्यातील सराईत गुन्हेगार पोलिसाच्या रुपात करीत होता श्रीगोंद्यात लूट

आरोपी ईरानी हा पोलिस असल्याचे भासवून लोकांना लूटत होता. चार महिन्यांपुर्वी मध्यप्रदेश मधील दौंडवरुन नगरकडे टेम्पो घेवून जाणाऱ्या एका चालकाला ईरानीसह तिघांनी पोलिस असल्याचे सांगत बोलण्यात गुंतवले.
Crime.jpg
Crime.jpg

श्रीगोंदे : पोलिस आहोत, अशी बतावणी करुन रस्तालूट करणाऱ्या अबालू जाफर ईरानी (abalu) व. ४७ शिवाजीनगर पुणे या सराईत आरोपीला श्रीगोंदे पोलिसांनी शिरुर पोलिसांच्या मदतीने शिताफिने पडकले. या आरोपीवर यापुर्वी राज्यातील विविध भागात सतरा गुन्हे दाखल आहेत. (The criminal was committing robbery in Shrigonda in Pune as a police constable)

श्रीगोंदे पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आरोपी ईरानी हा पोलिस असल्याचे भासवून लोकांना लूटत होता. चार महिन्यांपुर्वी मध्यप्रदेश मधील दौंडवरुन नगरकडे टेम्पो घेवून जाणाऱ्या एका चालकाला ईरानीसह तिघांनी पोलिस असल्याचे सांगत बोलण्यात गुंतवले. त्याचवेळी त्याच्या टेम्पोतील सतरा हजाराची रक्कम लूटली. याप्रकरणी श्रीगोंदे पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

पोलिसांनी या आरोपींचा शोध सुरु ठेवत त्यांच्याबद्दलची माहिती जमा केली होती. यातील एक आरोपी ईरानी हा ११ जून रोजी काष्टीत आल्याचे समजले आणि पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. सदर आरोपी हा शिरुर तालुक्याच्या दिशेने पळाल्यावर मांडवगण ता. शिरुर येथील पोलिसांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले. ईरानी याच्या़कडून आठ हजाराची रोकड व दुचाकी असा ५८ हजाराचा ऐवज हस्तगत केला आहे. चोरी, रस्तालूट, फसवणूक आदी प्रकारचे सतरा गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने त्याला १६ जूनपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

हेही वाचा..

 आरोपी पकडण्यास गेलेल्या पोलीसांना धक्काबुकी

श्रीरामपूर : ममदापूर (ता. राहाता) येथील एका आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांना संबधीत आरोपीच्या नातेवाईकांनी शिविगाळ करुन धक्काबुकी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

काल (रविवारी) दुपार सुमारास चितळी (ता. राहाता) परिसरात ही घटना घडली. यावेळी आरोपी पोलीसांना चकवा देत तेथून पसार झाला. याप्रकरणी पोलीस शिपाई किशोर जाधव यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात काल सांयकाळी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या वेळी आरोपीच्या नातेवाईकांनी पोलीसांवर खोटा गुन्हा दाखल करून अडचणीत आणण्याची धमकी दिल्याचे समजते. दरम्यान, या प्रकरणाची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाला कळविली. असून संबधीत आरोपीसह त्याच्या फारार असलेल्या नातेवाईकांचा पोलीसांकडुन शोध सुरु आहे.

ममदापूर येथील आरोपी राजेंद्र पारखे याला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर त्याच्या नातेवाईकांनी हल्ला करून धमकी दिल्याची घटना चितळी (ता. राहाता) परिसरात काल घडली. काल शहर पोलीस पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी चोरीसह रस्तालुटीच्या गुन्ह्यातील आरोपी राजेंद्र पारखे हा गोंधवणी परिसरात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस शिपाई किशोर जाधव, पंकज गोसावी, सुनील दिघे आणि राहुल नरवडे यांनी गोंधवणी परिसरात त्याचा शोध घेतला. परंतू तेथे गेल्यावर आरोपी चितळी येथील नातेवाईकांकडे गेल्याचे समजले. त्यानुसार पोलीसांनी काल दुपारच्या सुमारास चितळी येथे धाव घेतली.

तेव्हा सदर आरोपी पारखे हा नातेवाईकांच्या घरासमोर आढळुन आला. पोलीस आल्याचे पाहताच त्याने नातेवाईकांशी कुजबूज करुन धुम ठोकली. त्यावेळी पोलिसांनी पारखे यांच्या नातेवाईकांशी विचारपुस केली. तेव्हा सबंधीत नातेवाईकांनी आरडाओरडा करुन पोलीसांना धक्काबुकी करीत शिवीगाळ केली. काही जणांनी पोलीसांवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस शिपाई किशोर जाधव यांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com