प्रकाश आंबेडकर यांची बदनामी करणाऱ्यावर `अ‍ॅट्रॉसिटी` ! अकोले तालुक्यातून अटक - Atrocities on those who defame Prakash Ambedkar! Arrested from Akole taluka | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

प्रकाश आंबेडकर यांची बदनामी करणाऱ्यावर `अ‍ॅट्रॉसिटी` ! अकोले तालुक्यातून अटक

भरत पचंगे
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करुन त्यांची बदनामी करण्याचा प्रकार आकाश नवले याने केला होता.

शिक्रापूर : सोशल मिडीयावर वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची बदनामी केल्याप्रकरणी आकाश नंदू नवले (रा. जातेगाव बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे) याच्यावर अ‍ॅट्रोसिटी दाखल करुन त्याला अकोले तालुक्यातून (जि. नगर) अटक करण्यात आली. याबाबत पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी माहिती दिली. 

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करुन त्यांची बदनामी करण्याचा प्रकार आकाश नवले याने केला होता. याबाबत सखोल चौकशी करता तो जातेगाव बुद्रुक (ता.शिरूर, जि.पुणे) येथील असल्याचे निष्पन्न झाले. आकाश नवले याच्यावर याच कारणाने अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करुन या प्रकरणाची चौकशी उपविभागिय पोलिस अधिकारी राहूल धस यांनी केली व पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तपास पथके नियुक्त केली.

दरम्यान, नवले हा फरार झाल्याने त्याच्या शोधार्थ एक पथक कोतुळ (ता. अकोले, जि. नगर) येथे पोहचले व आरोपी पोलिस पथकाच्या हाताला लागला. त्याची सखोल चौकशी करुन त्याला शिरुर न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक नवनाथ रानगट यांनी दिली. 

नेत्यांची बदनामी सहन केली जाणार नाही

सोशल मीडिया ही सहजपणे कुणालाही उपलब्ध होते. पर्यायाने हवे तसे व्यक्त होताना विद्यमान राजकारणाती, समाजकारणातील, ऐतिहासीक, धार्मिक नेत्यांवर कुणी बदनामीकारक अशा काहीही पोस्ट केल्या, तर शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्या सहन केल्या जाणार नाहीत, असा इशारा पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी `सरकारनामा`शी बोलताना दिला.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख