जागतिक योगदिनी कारभारी आमदार लांडगे करणार योगा - On World Yoga Day, MLA Wolf will do yoga | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

जागतिक योगदिनी कारभारी आमदार लांडगे करणार योगा

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 जून 2021

रोगप्रतिकारक शक्ती मनाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी योगसाधना उपयुक्त मानली जात असल्याने कोरोना काळातील या योग शिबिरांत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी पक्षाच्या वतीने केले आहे.

पिंपरीः जागतिक योगदिनानिमित्त (Yoga) (ता. २१) येत्या सोमवारी पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे आमदार,पदाधिकारी, कार्यकर्ते योगा करणार आहेत.शहराच्या दोन्ही कारभारी आमदारांच्या मतदारसंघातील नगरसेवक आपल्या प्रभागात त्यासाठी योग शिबिरांचे आयोजन करणार आहेत.तर, शुक्रवारी २५ जून हा दिवस ते काळा दिवस म्हणून पाळणार आहेत. (On World Yoga Day, MLA Wolf will do yoga)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. त्यानिमित्त यावेळी राज्यात २ हजार ७०० हून अधिक ठिकाणी भाजपने योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवडमध्येही ती होणार असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष तथा पक्षाचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिली.

रोगप्रतिकारक शक्ती मनाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी योगसाधना उपयुक्त मानली जात असल्याने कोरोना काळातील या योग शिबिरांत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी पक्षाच्या वतीने केले आहे. योगविद्येचा प्रसार व्हावा आणि योगाचे महत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावे यासाठी सहभागी होणारे भाजपचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व   योगसाधनेची छायाचित्रे व व्हिडियो समाजमाध्यमांद्वारे प्रसारित करणार असून राज्यभर योगदिनाच्या उत्साहाचे अभूतपूर्व दर्शन घडवितील,असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान,योगदिनानंतर चार दिवसांनी येणारा २५ जून हा दिवस आणीबाणीविरोधी काळा दिवस म्हणून भाजप पाळणार आहे. या दिवशी पक्षाच्या वतीने व्हिडियो कॉन्फऱन्स, पत्रकार परिषदा व समाजमाध्यमांद्वारे आणीबाणीच्या जखमांची जाणीव समाजास करून देण्यात येईल. तसेच या माध्यमातून युवा पिढीला आणीबाणीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या झालेल्या गळचेपीची माहिती दिली जाईल,असे आ. लांडगे म्हणाले.स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदल्या गेलेल्या आणीबाणीद्वारे काँग्रेसने लोकशाहीची हत्या केली. अत्याचार व दडपशाहीमुळे या काळात देशभर भयाचे व असुरक्षिततेचे सावट निर्माण केले. मानवाधिकारांचे व माध्यमस्वातंत्र्याचे हनन करणाऱ्या या काळातील काँग्रेसी अत्याचारांची कहाणी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी २५ जून हा आणीबाणीविरोधी काळा दिवस पाळण्यात येणार आहे,असे ते म्हणाले.
 

हेही वाचा..

जयंत पाटलांमुळेच गोदावरीचा कायाकल्प

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख