आता पिंपरी चिंचवडमध्ये पालिका रुग्णालयात ऑक्सिजन गळती

सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही ऑक्सिजन गळती झाली. त्यावेळी एका टाकीमध्ये द्रवरुप ऑक्सिजन भरला जात होता.
आता पिंपरी चिंचवडमध्ये पालिका रुग्णालयात ऑक्सिजन गळती
Oxijan.jpg

पिंपरी : पिंपरी चिंचवड(Pimpri Chinchwad) महापालिकेच्या रुग्णालयात बुधवारी सायंकाळी ऑक्सिजनची गळती झाली. मात्र, वेळीच हा प्रकार लक्षात येऊन उपाययोजना केल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. (Oxygen leak at Municipal Hospital in Pimpri Chinchwad now)

ही घटना समजताच पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी लगेच घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. गळती झालेल्या पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सर्व रुग्ण सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले.वेळीच उपाय केल्याने दुर्घटना टळली तसेच इतर टाक्यात पुरेसा ऑक्सिजन साठा असल्याने ऑक्सिजन बेडवरील गंभीर  रुग्णांना याचा फटका बसला नसल्याचे त्यांनी सांगितले.

सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही ऑक्सिजन गळती झाली. त्यावेळी एका टाकीमध्ये द्रवरुप ऑक्सिजन भरला जात होता, तेव्हा टाकीच्या दाबातील चढ-उतारामुळे दबाव जास्त झाला.त्यामुळे जास्त दाब सोडण्यासाठीचे  वाल्व्ह खराब झाला आणि गळती झाली. मात्र, लगेचच पर्यायी  वाल्व्ह बसवल्याने ही गळती थांबली.

वायसीएममध्ये 300 रूग्ण दाखलआहेत. त्यापैकी गळती झालेल्या टाकीतून १३० रुग्णांना ऑक्सिजन पुरवला जात होता. मात्र,त्याचा पुरेसा साठा (बॅकअप) असल्याने या रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला नाही. हे सर्व रुग्ण व टाक्या सुरक्षित असल्याची खातरजमा केल्याचे आयुक्त पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर सरकारनामाला सांगितले.

हेही वाचा...

म्युकरमायकोसिसच्या सात रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

राहाता : शहरातील डॉ. मैड रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या सात रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या, तर चौघे औषधोपचाराने बरे झाले. सरकारी यंत्रणेने त्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले. या आजाराचे जिल्ह्याबाहेरील रुग्णही येथे उपचार घेतात, असे प्रतिपादन तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले. त्यांनी डॉ. मैड रुग्णालयास भेट देऊन उपचार घेत असलेल्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. डॉ. संतोष मैड व डॉ. आशुतोष मैड उपस्थित होते.
डॉ. मैड म्हणाले, ‘‘रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने हा आजार होत असला, तरी बऱ्याचदा अस्वच्छ मास्क, तसेच रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्याचा मास्क स्वच्छ नसेल तरीही या काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. हे उपचार करताना टास्क फोर्सचेही सहकार्य मिळाले.’’ डॉ. आशुतोष मैड यांनी स्वागत केले.

डाॅ. विखे यांचे पाठबळ

म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी खासदार डॉ. सुजय विखे यांचे पाठबळ मिळाले. प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार कुंदन हिरे यांनी औषधे पुरविण्यासाठी पुढाकार घेतला. या रुग्णालयात जबडा शस्त्रक्रिया तज्ज्ञ, मेंदूरोग तज्ज्ञ, नाक, कान व घसा तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ अशी टीम व सुसज्ज वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत.
- डॉ. संतोष मैड (स्त्री-रोगतज्ज्ञ)
 

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in