एक लाख अनधिकृत घरे अधिकृत होणार, भाजप पदाधिकाऱ्यांनी लगेचच घेतले श्रेय

नमूद करण्याजोगी बाब म्हणजे राज्य सरकारच्या या निर्णयावर शहर भाजप,त्यांच्या पालिकेतील पदाधिकारी व दोन्ही कारभारी आमदारांनी सडकून टीका केली होती.
Pimpri Chincwad corportion.jpg
Pimpri Chincwad corportion.jpg

पिंपरीः पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad) नवनगर विकास प्राधिकरण विलिनीकरणाचा पहिला फायदा प्राधिकरणातीलच एक लाख घरमालकांना होणार आहे. प्राधिकरणाच्या भूखंडावर अतिक्रमण करून बांधलेली वा वाढीव अनधिकृत बांधकाम झालेली ही घरे फक्त एक रुपया या नाममात्र दराने सबंधित घरमालकांकडे हस्तांतरित करण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभेने आज मान्यता दिली.त्यामुळे या घरांचा अधिकृत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (One lakh unauthorized houses will be made official, BJP office bearers immediately took credit)

नमूद करण्याजोगी बाब म्हणजे राज्य सरकारच्या या निर्णयावर शहर भाजप,त्यांच्या पालिकेतील पदाधिकारी व दोन्ही कारभारी आमदारांनी सडकून टीका केली होती. ती अजूनही सुरुच आहे. मात्र,या निर्णयामुळे सदर एक लाख अनधिकृत घरे अधिकृत होण्याचा मार्ग होताच त्याचे श्रेय भाजप पदाधिकाऱ्यांनी आज लगेच घेतले. महापौर माई ढोरे व सभागृह नेते नामदेव ढाके यांनी महासभेत मान्यता होताच त्वरित त्यासंदर्भात पत्रक काढले.

प्राधिकरणाचे विलीनीकरण पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजे पीएमआरडीए आणि पिंपरी पालिकेत करण्याचा अधिसूचना नुकतीच राज्य सरकारने जारी केली आहे. त्यानुसार अतिक्रमण झालेले भूखंड पालिकेकडे वर्ग करण्यात आले आहेत. या भाडेतत्वाच्या भूखंडावरील घरे त्यांच्या मालकांकडे हस्तांतरित करण्यास आज पालिकेच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली. यामुळे प्राधिकरणातील जागेवर अतिक्रमण झालेल्या जवळपास एक लाख घरांना अधिकृत होण्याचा मार्ग मोकळा होणार अशी माहीती पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.
 

हेही वाचा..

समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामास गती द्या

मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामास आणखी गती देण्यात यावी. महामार्गाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सोयीसुविधा उभारण्याबाबत तातडीने पावले उचण्यात यावीत. महामार्गाचा हा टप्पा लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले.मुंबई- नागपूर यांना जोडणारा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सीलिंक यासह प्रस्तावित कोकण सागरी महामार्ग व कोकण एक्स्प्रेस वे या प्रकल्पांचा मुख्यमंत्री ठाकरे यांनी आढावा घेतला. वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीस सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, सचिव (बांधकामे) अनिल गायकवाड, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी प्रकल्पांच्या माहितींचे सादरीकरण केले.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com