मावळात आमदार शेळकेंची साद! भेगडे देणार का प्रतिसाद

कोरोना काळात सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना अनेक शैक्षणिक संस्थांनी शैक्षणिक फीसाठी पालकांकडे तगादा लावला आहे.
Bhegade and shelke.jpg
Bhegade and shelke.jpg

पिंपरी : कोरोनात मावळातील पालकांना त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक शुल्कात तालुक्यात अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष असलेले माजी राज्यमंत्री बाळा भेगडे (Bala Bhegade) यांनी सवलत द्यावी, अशी लेखी मागणी करून त्यांची विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी मंगळवारी कोंडी केली. (MLA Shelke's call in Mavla! Why the response)

कोरोना काळात सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना अनेक शैक्षणिक संस्थांनी शैक्षणिक फीसाठी पालकांकडे तगादा लावला आहे. अशा स्थितीत कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी तालुक्यातील नामांकित शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष असलेल्या माजी आमदार भेगडे यांनी पुढाकार घेऊन शैक्षणिक संस्थाची बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या फी सवलतीसाठी विनंती केली असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले. तसे पत्रही त्यांना दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. 

कोविड संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले असून, मावळातही तशीच स्थिती आहे. मागील दीड वर्षात या महामारीमुळे अनेक कुटुंबातील व्यक्ती दगावल्या आहेत. त्याबरोबरच अर्थव्यवस्थाही खिळखिळी झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडून ते अडचणीत आले आहेत, याकडे शेळके यांनी लक्ष वेधले आहे.

लॉकडाऊनमध्ये अनेकांचे रोजगार बंद झाले असून, व्यवसाय देखील ठप्प झाले आहेत. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याचा फटका ग्रामीण अर्थव्यवस्थेला देखील बसला असून, मावळ तालुक्यात प्रामुख्याने नोकरदार वर्ग, छोटे दुकानदार, रिक्षावाले, टेम्पोवाले, टपरीधारक तसेच पर्यटन व्यवसायावर अवलंबून असणारे व्यवसाय अशा दैनंदिन व्यावसायिकांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. त्यामुळे अशा विदारक स्थितीत आपल्या मुलांची शैक्षणिक फी भरणे या पालकांना अशक्य झालेले आहे, असे आमदार शेळके यांनी म्हटले आहे.

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com