आमदार लांडगेंचा मदतीचा हात मंत्री वळसेंच्या आंबेगावसाठी

आंबेगाव तालुक्यातील पोखरी या दुर्गम आदिवासी भागातील पंढरीनाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला पिंपरी-चिंचवड भाजपच्या वतीने आमदारलांडगेंच्या पुढाकारातून तीन ट्रकभर विटा आणि सिमेंट देण्यात आले.
Pimpari.jpg
Pimpari.jpg

पिंपरीः भोसरीचे भाजपचे आमदार आणि पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे (Mahesh Landage) यांनी राज्याचे गृहमंत्री व राष्ट्रवादीचे आंबेगावचे (जि.पुणे) आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्या मतदारसंघातील पोखरी गावातीलआदिवासी महाविद्यालयाला लाखमोलाची मदत सोमवारी (ता. १४) दिली. (MLA Landage's helping hand for Minister Valsen's Ambegaon)

यानिमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू संस्थेला व त्यातही शाळा,कॉलेजला मदतीचा एक हात देण्याचा पाडलेला पायंडा आ. लांडगेंनी पुढे कायम ठेवला आहे.

आंबेगाव तालुक्यातील पोखरी या दुर्गम आदिवासी भागातील पंढरीनाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला पिंपरी-चिंचवड भाजपच्या वतीने आमदार लांडगेंच्या पुढाकारातून तीन ट्रकभर विटा आणि सिमेंट हे त्यांच्या इमारतीसाठी तातडीने लागणारे बांधकाम साहित्य बांधकाम साहित्य चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिनानिमित्त भेट देण्यात आले.

या संस्थेच्या शाळा व कॉलेजमध्ये लगतच्या ६८ आदिवासी गावे व पाड्यातील मुले शिक्षण घेत आहेत. त्यातील अनेकांना काही किलोमीटरची पायपीट करून शाळा, कॉलेजात यावे लागते आहे. चंद्रकांतदादांच्या गेल्या वाढदिवसानिमित्त आमदार लांडगे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव असलेल्या कोकणातील आंबवडेतील शाळेच्या पुर्नउभारणीसाठी मदत केली होती. कारण ही शाळा त्यावर्षीच्या चक्रीवादळात जमीनदोस्त झाली होती. तर, कोल्हापूरच्या महापूरातही त्यांनी गेल्यावर्षी चारशे ट्रक भरून गरजू साहित्याचा पुरवठा पुरग्रस्ताना केला होता.

गरजूंना व त्यातही संकटातील व्यक्तींना आ. लांडगे मदत करतात,हे माहित झाल्याने पंढरीनाथ कॉलेजचे प्राचार्य डॉ. शशिकांत साळवे यांनी कॉलेजच्या इमारतीसाठी मदत द्या, अशी विनंती काल म्हणजे रविवारी केली. इतर राजकीय नेत्यांप्रमाणे फक्त मदतीचे आश्वासन मिळेल, त्याची पूर्तता होणार नाही, असे डॉ. प्रा.साळवे यांना वाटले होते. मात्र, २४ तासाच्या आत तीन ट्रक भरून साहित्य पहिले आले व नंतर ती देणारे आमदार लांडगे आल्याचे पाहून पाहून आश्चर्य वाटले.

मदत मागताच ती लगेचच आली आणि ती देणारा माणूस नंतर आला,असे पहिल्यांदाच घडले. कसलीही स्वार्थ नसताना आ. लांडगेंची मोठी लाखमोलाची मदत झाली,अशी भावपूर्ण प्रतिक्रिया प्रा. साळवे यांनी या मदतीनंतर `सरकारनामा`ला दिली.

तसेच भविष्यातही आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन आ. लांडगेंनी दिल्याची माहिती त्यांनी दिली. तर, आदीवासी मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत, त्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा या स्वच्छ हेतूने ही मदत केली असल्याचे आ. लांडगे म्हणाले.तसेच काही किलोमीटरची पायपीट करून शाळा,कॉलेजला येणाऱ्या आदिवासी मुलांच्या वाहतुकीचा प्रश्न सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तळागाळातील सर्वांना शिक्षणाची दारे खुली व्हावीत,यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक माणसाचे समाजाच्या जडणघडणमध्ये मोठे योगदान आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने मदतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत आमदार लांडगे यांनी ही मदत देतानाच्या छोटेखानी सोहळ्यात व्यक्त केले.

‘श्रम शिक्षणातून ध्येय पूर्ती’ असे ब्रिद घेवून १ मे १९८२ साली स्थापन झालेल्या या श्री पंढरीनाथ विद्या विकास मंडळ संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मुलांच्या लग्नासाठी ठेवलेल्या ठेवी मोडून या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निधी दिल्याबद्दल त्यांचे आमदार लांडगेंनी कौतूक केले.

या वेळी श्री. पंढरीनाथ विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कोळप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  पश्चिम महाराष्ट्र प्रांतांचे कार्यकारिणी सदस्य हेमंत हरहरे, पिंपरी-चिंचवड भाजपा संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, स्वीकृत नगरसेवक गोपीकृष्ण धावडे, पोखरीच्या सरपंच नंदा कोळप, प्राचार्य डॉ. शशिकांत साळवे, सचिव आंबेकर गुरुजी आदी उपस्थित होते.
 

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com