नगर अर्बन बॅंकेच्या चिंचवड शाखेत 22 कोटींचा अपहार, गुन्हे दाखल

नगर अर्बन बॅंकेच्या चिंचवड शाखेत सुमारे 22 कोटींचा अपरहार केल्याच्या आरोपावरून बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष व संचालक मंडळासह आठ जणांविरुद्ध चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नगर अर्बन बॅंकेच्या चिंचवड शाखेत 22 कोटींचा अपहार, गुन्हे दाखल
urban bank.png

नगर : नगर अर्बन बॅंकेच्या चिंचवड शाखेत सुमारे 22 कोटींचा अपरहार केल्याच्या आरोपावरून बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष व संचालक मंडळासह आठ जणांविरुद्ध चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण, मंजूदेवी हरिओम प्रसाद (सर्व रा. पिंपरी चिंचवड), अभिजित नाथा घुले (रा. बुरूडगाव रोड, नगर), कर्ज उपसमितीमधील सदस्य व बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष व उपाध्यक्ष संचालक मंडळ आदींचा आरोपींमध्ये समावेश आहे.

बॅंकेचे वसुली व्यवस्थापक महादेव पंढरीनाथ साळवे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण यांनी संगणमत करून चिंचवडमधील इंडियन इंजिनिअरिंगच्या नावे 11 कोटी रुपयांच्या कर्जासाठी अर्बन बॅंकेच्या चिंचवड शाखेत अर्ज केला. त्यासाठी प्लॉट व बंगला त्यांनी गहाण ठेवला. कर्ज प्रकरणाची फाईलला कर्ज समिती आणि संचालक मंडळाने मंजुरी दिली. त्यानंतर अर्जदार चव्हाण यांनी नेश लिब टेक्‍नोरिअल फर्म नावाने पुन्हा 11 लाख रुपयांचे कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला. त्यासाठी दोन मिळकती गहाण ठेवण्याची तयारी दर्शविली.

ती फाईल बॅंकेचे व्हल्युअर अभिजित घुले यांनी शहानिशा करून कर्जसमितीकडे पाठविली. संचालक मंडळाच्या सभेने त्या कर्जप्रकरणास मंजुरी दिली. कर्जदाराच्या खात्यावर 22 कोटी वर्ग करण्यात आले. मात्र, त्याने आजपर्यंत कर्जाचा एकही हप्ता भरला नाही. बॅंकेच्या व्यवस्थापनाने साडेसहा कोटींचे कर्ज मंजूर केले असता संचालक मंडळाने त्याकडे दुर्लक्ष करीत 22 कोटींचे कर्ज मंजूर केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. 
दरम्यान,अभिजित घुले यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात स्वतंत्र फिर्याद देऊन कर्जदारांच्या मिळकतीचे मूल्य 22 कोटी नसून एक कोटी 39 लाख 67 हजार 130 इतके असल्याचे सांगून कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीने केल्याचे म्हटले आहे. 

Edited By - Murlidhar Karale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in