आमदार माणिक कोकाटे कोणाचे प्रतिनिधी? भांडवलदारांचे की लोकांचे - Whose representative is MLA Manik Kokate? Of the capitalists or of the people | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

आमदार माणिक कोकाटे कोणाचे प्रतिनिधी? भांडवलदारांचे की लोकांचे

निलेश छाजेड
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

या प्रकल्पासाठी पाण्याची उपलब्धता एकलहरे गावातील बंधाऱ्यातून केलेली आहे, परंतु या प्रकल्पाच्या चाचणीच्या वेळेस पापलान फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले होते. सुदैवाने यात काही जीवित हानी झाली नाही. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला रेल्वेमार्ग अजून पूर्ण तयार नाही.

नाशिकरोड : गुळवंच, सिन्नर येथील रतन इंडियाचा प्रकल्प सुरू व्हावा, यासाठी आमदार माणिक कोकाटे यांनी नुकतीच उर्जा सचिवांसोबत बैठक घेतल्याने ते जनतेचे लोकप्रतिनिधी आहेत की भांडवलदारांचे, असा प्रश्न नाशिककर विचारत आहेत. 
सिन्नर तालुक्यात उभारण्यात आलेला औष्णिक वीज प्रकल्प गेल्या पाच वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. 

या प्रकल्पासाठी पाण्याची उपलब्धता एकलहरे गावातील बंधाऱ्यातून केलेली आहे, परंतु या प्रकल्पाच्या चाचणीच्या वेळेस पापलान फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले होते. सुदैवाने यात काही जीवित हानी झाली नाही. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला रेल्वेमार्ग अजून पूर्ण तयार नाही. 

हा बंद अवस्थेत असलेला प्रकल्प जर सुरू करावयाचा असेल, तर पुन्हा त्याला जेवढे भांडवल खर्च केला आहे, तेवढाच खर्च करावा लागेल. असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
असे असताना नाशिक औष्णिक वीज केंद्र येथे जागा, पाणी रेल्वे मार्ग, राख साठवणूक बंधारा आदी सुविधा उपलब्ध असतांना सिन्नर प्रकल्पात लोकप्रतिनिधीना रस का हा प्रश्न आहे. नाशिक जिल्हा व महानिर्मितीसाठी भूषण असलेला प्रकल्पासाठी सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्न का करीत नाही, हा नागरिकांचा प्रश्न आहे.

सिन्नर गुळवंच येथील सेझ मधील प्रकल्पात कामांच्या माध्यमातून व देखभाल दुरुस्तीची इतर कामांमध्ये लोकप्रतिनिधी व दिग्गज मंडळी असल्याने नाशिक औष्णिक वीज केंद्राकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. असा नागरिकांचा आरोप आहे.

तर सरकार जबाबदार असेल

एकलहरे येथे सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असतानाही जर सरकार खासगी उद्योगांना चालना  देण्याचा विचार करीत असेल, तर या निर्णयाविरोधात उग्र जनआंदोलन उभारले जाईल व होणाऱ्या परिणामाला सरकार पूर्णतः जबाबदार असेल, असे मत प्रकल्प बचाव संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव  धनवटे यांनी केला.

स्थानिकांना रोजगार मिळावा

महानिर्मितीने सिन्नर येथील डबघाईला आलेला वीज प्रकल्प चालविण्यास न घेता , एकलहरे येथील प्रस्तावित प्रकल्प ६६० मेगा वॅट ला प्राधान्य दिल्यास स्थानिक शेतकरी व रोजंदारी कामगार यांना न्याय मिळेल, असे मत स्थानिक शेतकरी दिलीप राजोळे यांनी व्यक्त केले.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख