मालेगावात घुसले बांगलादेशी नागरिक, सहा जणांना अटक

संशयिताला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याला पासपोर्ट, शिधापत्रिका, आधारकार्ड, जन्म प्रमाणपत्र यासह विविध बनावट दस्तऐवज तयार करण्यासाठी मदत करणाऱ्या सहा संशयितांनाही जेरबंद करण्यात आले आहे.
bangaladesh.png
bangaladesh.png

मालेगाव : शहरातील हजारखोली भागात वास्तव्याला असलेल्या आलम अमीन अन्सारी (वय ३८) या बांगलादेशी नागरिकाला आयेशानगर पाेलिसांनी सापळा रचून पवारवाडी कार्यक्षेत्रातील मुंबई-आग्रा रोडवरील साई गोल्डन हॉटेलवरुन अटक केली.

संशयिताला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याला पासपोर्ट, शिधापत्रिका, आधारकार्ड, जन्म प्रमाणपत्र यासह विविध बनावट दस्तऐवज तयार करण्यासाठी मदत करणाऱ्या सहा संशयितांनाही जेरबंद करण्यात आले आहे.

मुंबई येथील साकीनाका पोलिसांनी बांगलादेशी घुसेखोराला बनावट पासपोर्ट व बनावट दस्तऐवज प्रकरणी अटक केलेल्या प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. शहरात आणखी काही बांगलादेशी घुसेखोर असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांनी सांगितले, की पोलिसांना हजारखोलीत बांगलादेशी घुसेखोर वास्तव्याला असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे आलम अन्सारी याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. त्याला शहरात घर घेवून देण्यासाठी अश्पाक शेख मुनाफ कुरेशी (रा. हजारखोली) याने मदत केली. त्यावरुन त्याची शिधापत्रिका व आधारकार्ड तयार झाले. त्यानंतर जन्म प्रमाणपत्र व पासपोर्टसह त्याला विविध बनावट दस्तऐवज तयार करण्यासाठी मदत करणाऱ्या एकलाख अहमद मोहंमद मुस्तफा (रा. नयापुरा), इम्रान शेख रशीद (रा. नागछाप झोपडपट्टी), इकबाल खान मुनीर खान (रा. तंजीबनगर), ललीत मराठे (रा. कैलासनगर) व जाकीर अली अब्दुल मजीदखान (रा. अख्तराबाद) या सहा जणांसह एकूण सात जणांना शुक्रवारी (ता. ६) सकाळी अटक करण्यात आली.

जहीर हाशीम हनिबा हा अन्य एक बांगलादेशी नागरीक फरार आहे. १ ऑक्टोबर २०२० ते ५ नोव्हेंबर २०२० दरम्यान संशयितांनी हा कारनामा केला. पोलिसांनी अलम अन्सारी याचा पासपोर्ट जप्त केला आहे. या सात जणांविरुध्द आयेशानगर पोलिस ठाण्यात फसवणूक, बनावट दस्तऐवज, परकीय नागरीक कायद्याचे उल्लंघन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, पोलिस उपअधिक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गिरी, हवालदार राजेंद्र चौधरी, पोलिस नाईक श्याम पवार, योगेश ठाकूर, हेमंत देवरे, भारत पाटील, दीपक खैरनार आदींनी ही कारवाई केली.
 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com