गुंड मुन्ना यादव कुणाचा कार्यकर्ता, हे फडणवीसांनी सांगावे, अनिल देशमुखांचे प्रतिउत्तर - Fadnavis should tell whose activist Munna Yadav is, Anil Deshmukh's reply | Politics Marathi News - Sarkarnama

गुंड मुन्ना यादव कुणाचा कार्यकर्ता, हे फडणवीसांनी सांगावे, अनिल देशमुखांचे प्रतिउत्तर

प्रशिक मकेश्वर
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

फडणवीस यांनी राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढत चालली, असा आरोप केला होता, यावर देशमुख यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना प्रतिउत्तर दिले.

अमरावती : नागपूरसह राज्यात कशी काय गुंडगिरी वाढली, मला फडणवीस यांना हा प्रश्न विचारायचा आहे, की नागपूर शहरातील एक नंबरचा गुंड मुन्ना यादव हा कोणाचा कार्यकर्ता आहे, हे उत्तर त्यांनी द्यावं, अशी टीका गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

फडणवीस यांनी राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढत चालली, असा आरोप केला होता, यावर देशमुख यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना प्रतिउत्तर दिले.

देशमुख म्हणाले, की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नागपूर शहारात मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी वाढलेली. यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे वाढले होते, तसेच हत्याच्या घटना सुद्धा घडल्या, याची संपूर्ण राज्यभर चर्चा होती. त्या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी होती. त्यावेळी नागपूरसह राज्यात कशी काय गुंडगिरी वाढली, तेव्हा मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे, की नागपूर शहरातील एकनंबरचा गुंड मुन्ना यादव हा कोणाचा कार्यकर्ता आहे, हे उत्तर त्यांनी द्यावं. त्यावेळी गुंड मुन्ना यावर हा फरार होता, तेव्हाच्या आमच्या विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता, तेव्हा गुंड मुन्ना यादव याचा खरा तपास करायचा असेल, तर देवेंद्र फडणवीस यांचा मोबाईल तपासावा, असा त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांचे खरे लोकेशन मिळेले, आरोप त्यावेळी मुंडे यांनी केलेला होता. असेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ते आज अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रवादी परिसवाद कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान बोलत होते. राज्यातील गुन्हेगारीवर पोलीस खात्याकडून शंभर टक्के कारवाई केली जात आहे, तर पोलिसांवर हल्ला करणाऱ्याची कुठल्याही परिस्थिती दया केली जाणार  नाही, असे या वेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
 

हेही वाचा..

पिचकारी बहाद्दरांना आवरा.. 

संगमनेर : संगमनेरकरांचा दिवस सुरू होतो, पालिकेच्या घंटागाड्यांवरील "स्वच्छ भारत का इरादा, इरादा कर लिया हमने...' या गाण्याच्या सुरावटीने! स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत पालिका गेल्या तीन वर्षांपासून शहराच्या स्वच्छतेसाठी काम करीत आहे. मात्र, शहरासह रस्ते, सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांना रोखण्याचे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे. 

दरवर्षी होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणात हिरीरीने भाग घेऊन, शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सातत्याने विविध उपक्रम सुरू आहेत. त्या अंतर्गत शहरातील खुल्या गटारी बंदिस्त करणे, सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था, शहरातील सर्व प्रभागातील ओला-सुका व प्लॅस्टिकचा अविघटनशील कचरा अलग करून गोळा करण्यासाठी सकाळी घंडागाड्यांवरील कर्मचारी कार्यरत असतात. तसेच शहरातील सार्वजनिक चौक, रस्ते, कार्यालयांत आवर्जून स्वच्छता मोहीम राबवली जाते.

कचऱ्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार करण्याचा पथदर्शी प्रकल्प सुरू आहे. 
मागील वर्षीप्रमाणे यंदाही पालिकेने स्वच्छ भारत सर्वेक्षण स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यासाठी शहरातील विविध प्रभागातील सार्वजनिक भिंतीवर स्वच्छतेचे संदेश लिहून जनजागृती करण्यात आली. त्याचा चांगला परिणामही समोर आला. मात्र, या चांगल्या कामाला गालबोट लावण्याचे काम गुटखाप्रेमी करीत आहेत. आपल्याच मस्तीत "सब भुमी गोपाल की..' या भावनेतून रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, मंदिर, कार्यालये, अगदी कुठेही मुक्तपणे पिचकाऱ्या मारणाऱ्यांनी या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे. अनेक कार्यालये एकत्र असलेले यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवन व तहसील कार्यालयही यातून सुटले नाही. पायऱ्यांसह भिंती व काचेची तावदाने पिचकाऱ्यांनी रंगली आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंडाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला असला, तरी कुठेही थुंकणाऱ्यांना चाप कसा लावणार, हा यक्षप्रश्न आहे. 

वठणीवर कसे आणणार? 

बसस्थानकाजवळून जाणाऱ्या अकोले रस्त्याच्या कडेला नव्याने रंगवलेल्या स्वच्छतेच्या संदेश देणाऱ्या भिंती रिक्षा थांब्यामुळे लालेलाल झाल्या आहेत. आपल्या या गलिच्छ कृत्याची जराही लाज न वाटणाऱ्यांना वठणीवर आणण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. 

 

Edited By- Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख