लोणार सरोवर विकासाचा निश्चित नियोजन आराखडा तयार करावा : ठाकरे - A definite planning plan should be prepared for the development of Lonar Sarovar: Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

लोणार सरोवर विकासाचा निश्चित नियोजन आराखडा तयार करावा : ठाकरे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

ठाकरे यांनी आज लोणार सरोवर येथील वनकुटी व्ह्यू पॉईंटला भेट दिली. या वेळी त्यांनी लोणार सरोवराविषयी माहिती जाणून घेतली.

बुलडाणा : लोणार सरोवर हे जैवविविधतेचे भांडार आहे. या सरोवराचा विकास करताना एक निश्चित नियोजन तयार करावे. त्यानुसार आराखडा तयार करावा आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी केली, तरच हे सरोवर पर्यटनासाठी नावारूपास येईल, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. 

ठाकरे यांनी आज लोणार सरोवर येथील वनकुटी व्ह्यू पॉईंटला भेट दिली. या वेळी त्यांनी लोणार सरोवराविषयी माहिती जाणून घेतली.

लोणार सरोवरात जैवविविधता विकसित झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी विकास करताना नेमका विकास कोणत्या पद्धतीने करावा, याचा विचार एकत्रितरीत्या करावा. या ठिकाणी मंदिरांची संख्या अधिक आहे, त्यामुळे याठिकाणी वन पर्यटन किंवा मंदिराच्या भेटी अशा पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड करून त्याच प्रस्तावावर काम करावे. या ठिकाणची वनसंपदा धोक्यात येऊ नये, यासाठी मर्यादितच प्रवेश ठेवावा. लोणार सरोवराचा विकास रणथंबोरच्या धर्तीवर करता येऊ शकतो काय याचीही पडताळणी करावी. 

लोणार सरोवर हे ज्याप्रमाणे वन पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे वैज्ञानिकही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे त्यांचाही विचार होणे गरजेचे आहे. पर्यटकांसाठी या ठिकाणी सरोवराच्या वरच्या बाजूला एक पायरस्ता ठरवावा. या रस्त्यावर पर्यटकांना थांबण्यासाठी स्थळे विकसित करावी. सरोवराच्या चारही बाजूला अशी व्यवस्था झाल्यास पर्यटकांनाही सोयीचे होईल, अशा सूचनाही त्यांनी या वेळी केल्या.

 

हेही वाचा..

तीन दिवशीय ऑनलाईन इंडक्शन कार्यक्रम

संगमनेर : विद्यार्थ्यांनी कोविडकडे संकट म्हणून न पाहता, संधी म्हणून पहावे आणि महाविद्यालयाने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांचा फायदा करुन घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी केले.

वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय तसेच एम. कॉम या अभ्यासक्रमाची तोंडओळख होण्यासाठी विविध स्पर्धा, कार्यक्रम व कार्यालयीन माहिती देण्यासाठी संगमनेर महाविद्यालयात वाणिज्य विभाग आणि संशोधन केंद्रामार्फत तीन दिवसीय विद्यार्थी प्रेरण ( इंडक्शन प्रोग्राम ) कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

ते म्हणाले, की महाविद्यालयाने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांचा योग्य पध्दतीने वापर करुन स्वतःचा सर्वांगिण विकास साधावा. विद्यार्थ्यांसाठी कोविडमुळे सुरु असलेल्या ऑनलाईन वर्गाची माहिती देतांना अतिशय प्रतिकुल काळातही उत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी विद्यालय प्रयत्नशील आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध सहाय्य योजना व वसतीगृह सुविधा महाविद्यालय उपलब्ध करुन देत आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख