कोल्हापूरमध्ये भाजपचा एकही आमदार नाही, मग राजीनामा कोण देणार : सतेज पाटील - There is no BJP MLA in Kolhapur, then who will resign: Satej Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

कोल्हापूरमध्ये भाजपचा एकही आमदार नाही, मग राजीनामा कोण देणार : सतेज पाटील

सुनील पाटील
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

कोल्हापूरातील कोणत्याही मतदार संघातून मी निवडूण येऊ शकतो. तुम्ही राजीनामा द्या, निवडुन आलो नाहीतर हिमालयात जाईन असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले होते.

कोल्हापूर :चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमधून निवडणूक लढवण्याची संधी गमावली आहे. भाजपचा कोल्हापूरात एकही आमदार नाही. मग चंद्रकांत पाटील कोणाला राजीनामा द्यायला लावता. त्यांनी  2019 मध्येच हा निर्णय घ्यायला पाहिजे होता, असा मिस्कील टोला गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूर चे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला.  

कोल्हापूरातील कोणत्याही मतदार संघातून मी निवडून येऊ शकतो. तुम्ही राजीनामा द्या, निवडून आलो नाही तर हिमालयात जाईन, असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले होते. यावर पालकमंत्री पाटील यांना विचारले असता त्यांनी हा टोला लगावला.

चंद्रकांत पाटील यांच्या याच वक्तव्याचा सकाळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी समाचार घेतला होता. तर सायंकाळी कोल्हापूर काँग्रेस कमिटीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सतेज पाटील यांनी सुद्धा टीका केली आहे. 

केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या काळ्या कृषी कायद्या विरोधात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने 5 नोव्हेंबरला कोल्हापूरमध्ये भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे ही गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

 

Edited By - Murlidhar Karale
 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख