मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार : जयंत पाटील - PM to meet Narendra Modi on Maratha reservation: Jayant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार : जयंत पाटील

सरकारनामा ब्युरो
रविवार, 6 जून 2021

मराठा आरक्षणाला सर्वच स्तरातून, समाजातून वेगळ्या संघटनांकडून पाठिंबा मिळालेला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात याबाबत वेगळा निर्णय झाला.

सांगली ः मराठा समाजाला सर्व धर्माचा पाठिंबा आहे. आरक्षण मिळावे, असे सर्वांचे मत आहे.  मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. (PM to meet Narendra Modi on Maratha reservation: Jayant Patil)

सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, की मराठा आरक्षणाला सर्वच स्तरातून, समाजातून वेगळ्या संघटनांकडून पाठिंबा मिळालेला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात याबाबत वेगळा निर्णय झाला. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून, आता दिल्लीमध्ये संसदेत याबाबत चर्चा आणि आवाज होणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षण देण्यासाठी आग्रह करन्यासाठी प्रयत्न करत आहे.

अलमट्टीविषयी बैठक घेणार

मागील पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबत बोलताना पाटील म्हणाले, की पावसाळा सुरू झाला असल्याने पूरस्थितीबाबत नियोजन सुरू आहे. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर अलमट्टी पाणी नियोजनाबाबत कर्नाटक राज्याच्या मंत्र्यासोबत बैठक घेणार आहोत, असे पाटील यांनी सांगितले.

 

हेही वाचा..

शिवसेनेच्यावतीने राज्यभिषेक दिनानिमित्त अभिवादन

नगर : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना असून, खर्‍या अर्थाने ती स्वराज्याची सुरुवात होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा येणार्‍या हजारो वर्षे संपूर्ण भारतीयांसाठी प्रेरणादायी असाच गौरवपूर्ण क्षण आहे, असे प्रतिपादन शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर यांनी केले.

शिवराज्यभिषेक दिनानिमित्त शिवसेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम तसेच मान्यवर उपस्थित होते.
कोरगावकर म्हणाले, की शिवाजी महाराजांना राज्यमान्यता मिळाली व स्वराज्य परिपूर्ण झाले. रयतेचा राजा म्हणून महाराजांचा लौकिक वाढला. शिवसेनेने नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच समाजोपयोगी कार्य करत आहे. जनतेला आपले राज्य वाटावे, असे स्वराज्य निर्माण करण्याचा महाआघाडी सरकारचा प्रयत्न सुरु आहे.

शहरप्रमुख दिलीप सातपुते म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांसाठी आणि रयतेसाठी हा आनंदाचा दिवस. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा दिन. याच दिवशी महाराजांच्या नेतृत्वाखाली काळोखाचे तट कोसळून स्वराज्याचा सुर्योदय झाला. त्यानंतर रयतेचे राज्य निर्माण झाले. शिवसैनिक हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आहेत. जनतेच्या प्रश्‍न सोडविण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात, असे सांगितले.

 

हेही वाचा..

मराठा आरक्षण ः पुन्हा लढण्याची तयारी

 

Edited B y- Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख