पंढरपूरची जागा जिंकायचीच ! राष्ट्रवादीच्या बैठकित सूर, लढत प्रतिष्ठेची - Pandharpur was replaced by NCP | Politics Marathi News - Sarkarnama

पंढरपूरची जागा जिंकायचीच ! राष्ट्रवादीच्या बैठकित सूर, लढत प्रतिष्ठेची

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 एप्रिल 2021

तालुक्यात पंचायत समितीचे आठ गण असून, 2019 मधील निवडणुकीत भारत भालके यांना गावनिहाय पडलेल्या मताची आकडेवारी समोर ठेवून यंदाच्या पोटनिवडणुकीत गावनिहाय मतदान कसे असेल, याची विचारणा केली जात आहे.

मंगळवेढा : पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक ही महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून लढविली जाणारी पहिलीच निवडणूक असून, ही जागा भाजपाच्या ताब्यात न देता निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीने देखील गांभीर्याने घेतली आहे.

(कै.) भारत भालके यांच्या अकाली निधनाने होणाय्रा पोटनिवडणुकासाठी भाजपाने ताकद लावल्याने राष्ट्रवादीने जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार यशवंत माने, उमेदवार भगीरथ भालके, निरीक्षक सुरेश घुले, दीपक साळुंके-पाटील, गणेश पाटील, पश्चिम महाराष्ट्र ओबीसीचे प्रभारी लतीफ तांबोळी, तालुकाध्यक्ष भारत बेदरे आदी उपस्थित होते.

तालुक्यात पंचायत समितीचे आठ गण असून, 2019 मधील निवडणुकीत भारत भालके यांना गावनिहाय पडलेल्या मताची आकडेवारी समोर ठेवून यंदाच्या पोटनिवडणुकीत गावनिहाय मतदान कसे असेल, याची विचारणा केली जात आहे व त्यांच्या गावात मतदान कमी पडले, त्या गावात मत कमी पडण्याचे कारण देखील विचारले जात होते.

किंमत कमी पडलेल्या गावातून कार्यकर्ते यंदाच्या निवडणुकीत मागील चूक दुरुस्त करून मताधिक्य देणार असल्याचे सांगताच आता कोणत्या कारणामुळे मताधिक्य देणार हे देखील या कार्यकर्त्यांना पालकमंत्री व जलसंपदामंत्री विचारत होते. करेक्ट कार्यक्रमासाठी राज्यभर प्रसिद्ध झालेले जलसंपदामंत्री जयंत पाटील उपस्थित कार्यकर्त्यांची हजेरी घेऊन याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना देत होते.

(कै.) भारत भालके यांनी 11 वर्षात केलेले काम हे तुमच्यासमोर आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून तालुक्याचा भगीरथ विकास करण्यासाठी भगीरथ विधानसभेत असला पाहिजे, ही भूमिका समोर ठेवून मतदारांनी काम करावे, जेणेकरून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे शक्य होईल. आतापर्यंत या तीन विधानसभा निवडणुका या भारत भालके यांनी जनता हाच माझा पक्ष म्हणून स्वतःच्या हिमतीवर पैलवानी डाव टाकत जिंकल्या होत्या, परंतु परंतु पोट निवडणुकीच्या माध्यमातून ही जागा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लक्ष घालत यंत्रणा हाताळत आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले.
 

दरम्यान, या वेळी शहराचाही आढावा घेण्यात आला. मागील निवडणुकीत कमी मते पडलेल्या मताधिक्याची दुुरुस्ती करू, असे शहरातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी शहराध्यक्ष मुझ्झमील काझी, नगराध्यक्षा अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, पक्षनेते अजित जगताप, प्रविण खवतोडे, संदीप बुरकूल आदी उपस्थित होते.

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख