बोबडं किरीट सोमय्या तर उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीचीच चौकशी करा म्हणतंय

चंद्रकांत पाटील यांनी काय केले. कायमशरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांनी हे लक्षात घ्यावं, तब्बल ५० वर्षे शरद पवार निवडणूक हारलेले नाहीत.
somaiya and mushrif.png
somaiya and mushrif.png

कोल्हापूर : ‘‘भाजपची मंडळी सतत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी करीत आहेत. बोबडं किरीट सोमय्या तर उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीचीच सारखं चौकशी करा म्हणतंय.. ठाकरे यांच्या पूर्वजांची संपत्ती आहे. याच्या बापाचं काय जातंय समजत नाही, असा टोला मुश्रीफ यांनी लावला.

येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या काळात झालेल्या विकासकामांचा आढावा त्यांनी घेतला. या वेळी बोलताना त्यांनी भाजप नेत्यांच्या आरोपांबाबत मिश्किल शब्दांत समाचार घेतला. भाजपनेते चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेताना त्यांनी कोपरखिळी मारली.

मुश्रीफ म्हणाले, ‘‘चंद्रकांत पाटील यांनी काय केले. कायम शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांनी हे लक्षात घ्यावं, तब्बल ५० वर्षे शरद पवार निवडणूक हारलेले नाहीत. मुख्यमंत्री पदापासून ते देशाच्या संरक्षण मंत्र्यांपर्यंत त्यांनी अनेक पदे भूषविली आहेत; मात्र ज्या दादांना दहा वर्षांत स्वत:चा मतदारसंघ तयार करता आला नाही, मंत्रिपदाच्या काळात मतदारसंघ टिकवता आला नाही, ते आता पवारांवर टीका करत आहेत. टीका करण्याचे कारणही काहीच नसते. नुसतीच टीका करायची. दादांनी आधी स्वतःच्या मतदारसंघाबाबत विचार करावा. नंतर पवारांसारख्या नेत्यांच्या नादी लागावे.``

कोरोनाबाबत चिंता व्यक्त

मुश्रीफ यांनी कोरोनाबाबत चिंता व्यक्त केली. दिल्ली, अहमदाबाद येथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आपल्याकडेही दुसरी लाट येण्याची शक्‍यता आहे. कोरोना आपल्या उंबरठ्यावर आला आहे. त्यामुळे सर्वानी खबरदारीच्या उपाययोजना राबवाव्यात. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण आटोक्यात आणण्यात यश आले असले, तरी दिवाळीच्या काळात झालेल्या गर्दीमुळे कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. मागील अनुभव पाहता सरकार या महामारीच्या युद्धाला सज्ज असले, तरी नागरिकांनीही त्याला चांगली साथ दिली पाहिजे. लाॅकडाऊनसारख्या प्रकारांमुळे अनेक अडचणी उपस्थित होत आहेत. त्यामुळे आता नागरिकांनीच स्वतः काळजी घेतली पाहिजे. एकमेकांना आधार दिला पाहिजे. कोरोनाच्या काळात अडचणीत असलेल्यांना मदत केली पाहिजे, अशी अपेक्षा मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com