कोल्हापूर : सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत यावे, म्हणून कोणीही विचारायला गेलेले नाहीत. पण, भाजपला "ब्लॅक मेल' करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ते बुजगावने करीत आहेत. कोणालाही स्वार्थासाठी स्वाभिमानीचा वापर करुन देणार नाही, असा पलटवार माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी `सरकारनामा`शी बोलताना केला.
सदाभाऊ खोत स्वाभिमानीच्या वाटेवर, अशा आशयाचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटने राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यापार्श्वभूमीवर शेट्टी यांच्याशी संवाद साधला.
शेट्टी म्हणाले, की खोत यांच्याकडून स्वाभिमानीचा वापर करुन घेतला जात आहे. केवळ आणि केवळ भाजपला भिती दाखण्यासाठी ही खेळी सुरु आहे. आम्ही त्यांना स्वाभिमानीचा वापर करु देणार नाही. ज्यांना आम्ही स्वाभिमानीत येणार का? म्हणून विचार पण नाही. तेच आता स्वाभिमानीचा वापर करुन भाजपवर दबाव टाकत आहेत. परवा-परवापर्यंत केंद्र सरकारने शेती उत्पादनाला हमी भाव द्यावा, अशी मागणी करत होते. वेळप्रसंगी राजू शेट्टींना खांद्यावर घेवू, असेही ते म्हणत होते. पण आता ती वेळ राहिली नाही. केवळ भाजपला ब्लॅकमेल करण्यासाठीचाच हा फंडा आहे. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणाचेही बुजगावने होणार नाही आणि होवूही देणार नाही, असा पलटवार शेट्टी यांनी केला.
खोत यांनी स्वाभिमानी यावे आणि आम्ही स्विकारावे, असा कोणताच प्रश्न नाही, असे शेट्टी यांनी सांगितले.
Edited By - Murlidhar karale

