`पुणे पदवीधर`मधून चौगुले, शिक्षक मतदार संघातून लाड यांची माघार 

पुणे पदवीधर मतदार संघातून रयत क्रांती संघटनेचे उमेदवार प्रा. एन. डी. चौगुले यांच्यासह शिक्षक मतदार संघातून दादासाहेब लाड यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अवाहनाला मान देत आज माघार घेतली.
lad.png
lad.png

कोल्हापूर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी इच्छुकांची गर्दी केली आहे. यातच आता प्रत्येकजण आपला उमेदवारी कायम रहावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. ही निवडणूक पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी असली तरीही राजकीय पक्षांकडून आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधकांनी माघार घ्यावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान, पुणे पदवीधर मतदार संघातून रयत क्रांती संघटनेचे उमेदवार प्रा. एन. डी. चौगुले यांच्यासह शिक्षक मतदार संघातून दादासाहेब लाड यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अवाहनाला मान देत आज माघार घेतली.

पदवीधरमधून रयत क्रांती संघटनेचा उमेदवाराचा फटका, मित्र पक्ष असलेल्या भाजपच्या उमेदवाराला बसू नये. या उमेदवारांने माघार घ्यावी, यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख खोत यांच्याशी चर्चा केली. ही माघार घेण्यात आली. तर, शिक्षक मतदारमधून माघार घेत असल्याची माहिती दादासाहेब लाड यांनी दिली.

दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनी सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नात राहू, तसेच कोजिमाशिसे पतसंस्था निवडणुकीसाठी लाड यांना जयंत आसगांवकर हे बिनशर्त पाठिंबा देतील, अशी ग्वाहीही दिली. भविष्यात विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावे. जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू व्हावी, यासाठी कार्यरत राहण्याची भूमिका असल्याचे दादासाहेब लाड यांनी स्पष्ट केले.

या वेळी कोजिमाशिसे पतसंस्था कोल्हापूरचे चेअरमन कैलास सुतार, पगारदार पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष मनोहर पाटील, मच्छिंद्र शिरगांवकर, अशोक मानकर, राजेश पाटील, नामदेव गुंजवते उपस्थित होते 
 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com