ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत प्रतीक करतोय रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा - oxygen supply to patients until they get an oxygen bed | Politics Marathi News - Sarkarnama

ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत प्रतीक करतोय रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा

संपत देवगिरे
शनिवार, 1 मे 2021

प्रतीक ताजनपुरे म्हणाले, घरापासून हॉस्पिटलमध्ये जाऊन बेड मिळेलपर्यंत अनेक वेळा रुग्ण दगावतात. त्यामुळे अशा अत्यवस्थ रुग्णांना आम्ही घरपोच ऑक्सिजन पुरवण्याचे मोफत काम करीत आहोत. यासाठी आम्हाला गॅरेज मालकांनी सिलेंडर दिले असून ते आम्ही रिफिलिंग करून घेत आहोत. यातून रुग्ण वाचण्याचे प्रमाण वाढले आहे.

नाशिक : सध्या रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नाही. बेड न मिळाल्याने रुग्ण घरी अथवा गाडी मध्येच आपला श्वास सोडीत आहेत. यावर उपाय म्हणून नाशिकरोड येथील प्रतीक ताजनपुरे या युवकाने अनोखी शक्कल लढवून घरपोच ऑक्सिजन सिलेंडर व सेट अप लावण्याची व्यवस्था केली आहे.

रुग्णाला घरून निघाल्यापासून तर ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत ऑक्सिजन मिळावा, यासाठी रिमोट ऑक्सिजन सिलेंडर व वैद्यकीय उपकरणे लावण्यात येत आहेत. ही गरजवंत शक्कल सध्या अनेक रुग्णांचा जीवदान देत आहे.

याविषयी सामाजिक कार्यकर्ते प्रतीक ताजनपुरे म्हणाले, घरापासून हॉस्पिटलमध्ये जाऊन बेड मिळेलपर्यंत अनेक वेळा रुग्ण दगावतात. त्यामुळे अशा अत्यवस्थ रुग्णांना आम्ही घरपोच ऑक्सिजन पुरवण्याचे मोफत काम करीत आहोत. यासाठी आम्हाला गॅरेज मालकांनी सिलेंडर दिले असून ते आम्ही रिफिलिंग करून घेत आहोत. यातून रुग्ण वाचण्याचे प्रमाण वाढले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख