मला ईडीची नोटीस नाही, आली तर सामोरे जाणार : खडसे - I don't have ED notice, I will deal with it if it comes: Khadse | Politics Marathi News - Sarkarnama

मला ईडीची नोटीस नाही, आली तर सामोरे जाणार : खडसे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 26 डिसेंबर 2020

या बाबत खडसे ते म्हणाले, की मला अजुन ईडी ची कोणतीही नोटीस आली नाही. मात्र आली तर निश्चित त्याला सामोरे जाईन.

जळगाव : मला ई डी ची नोटीस आलेली नाही, मात्र आली तर आपण त्याला सामोरे जाऊ, असे मत एकनाथ खडसे यांनी `सरकारनामा`शी बोलताना व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांना ई डी ची नोटीस आली असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. ई डी ने त्यांना नोटीस बजावली असून, त्यांना 30 डिसेंबर रोजी चौकशी करीता पाचारण करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

या बाबत खडसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की मला अजुन ईडी ची कोणतीही नोटीस आली नाही. मात्र आली तर निश्चित त्याला सामोरे जाईन. 

एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या वेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर टीका केली होती. आपल्या वर जर ई डी लावली तर आपण त्यांच्या मागे सीडी लावू, असा इशारा त्यांनी दिला होता.
 

हेही वाचा...

युरियाची गरज भागवावी : कोल्हे

कोपरगाव : राज्यातील युरियाची गरज लक्षात घेता मागील वर्षीच्या तुलनेत कृभकोने चार लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त युरीयाचा पुरवठा करावा, अशी मागणी कृभकोचे प्रतिनिधी संजीवनी उदयोग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केली.

कृभकोच्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी त्यांनी ही मागणी केली. नवी दिल्ली येथे कृभकोचे अध्यक्ष चंद्रपाल सिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली ही आॅनलाईन सभा घेण्यात आली. कृभकोचे व्यवस्थापकीय संचालक राजन चौधरी यांनी प्रास्ताविक केले. देशभरातून कृभकोचे सुमारे 60 सदस्य बैठकीसाठी उपस्थित होते.

नागपूर, पुणे आणि कोपरगाव या ठिकाणी महाराप्ट्रातील प्रतिनिधींनी आपला सहभाग नोंदविला. या सभेसाठी प्रतिनिधी रामनाथ चिंधू पाटील (जळगाव), भगवानराव काजे, (कन्नड), पराग संधान, डी. पी.मोरे (कोपरगाव), कारखाना व्यवस्थापक शिवाजी दिवटे, टि. आर. कानवडे, कृभकोचे अधिकारी धनाजी देषमुख,नाशिक, सुदर्शन पाटील, अहमदनगर व शेतकरी सहकारी संघाचे व्यवस्थापक हरीभाउ गोरे हे उपस्थित होते. 

कोल्हे म्हणाले, की मागील वर्षात कृभकोने 4 लाख मेट्रिक.टन युरियाचा पुरवठा महाराष्ट्र्राकरीता केला होता, परंतु यावर्षी 1 लाख 85 हजार मे.टन इतका पुरवठा केलेला असल्याने त्यामध्ये वाढ करुन मागील वर्षाप्रमाणे महाराष्ट्र्रासाठी युरियाचा तुटवडा लक्षात घेउन कृभकोने याहीवर्षी 4 लाख मेट्रिक टन युरीयाचा पुरवठा करावा. त्याचप्रमाणे मागील वर्षीच्या कंपोस्ट खताचा 5 हजार मे.टन पुरवठा केला होता, त्या पुरवठयात वाढ करून यावर्षी कंपोस्ट खते 10 हजार मे.टन पुरविण्यात यावी, अशी मागणीही कोल्हे यांनी केली.

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख