पोटाला बॉम्ब लाऊ; पण आरक्षण घेऊच : नरेंद्र पाटील - Bomb the stomach; But let's take reservation: Narendra Patil | Politics Marathi News - Sarkarnama

पोटाला बॉम्ब लाऊ; पण आरक्षण घेऊच : नरेंद्र पाटील

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 5 जून 2021

 मराठ्यांचा मुडदा पाडला. या काळात आम्ही चार लोक एकत्र आलो आणि चार मुडदे पाडले तर आम्ही कोणाच्या बापाला घाबरतोय का? असे म्हणत महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले.

बीड : फडणवीस सरकारने मराठ्यांना दिलेले आरक्षण महाविकास आघाडी सरकारने घालविले. कोरोना आहे म्हणून घरी बसायचं का? माझ्या बापाचे सांडलेले रक्त मी आणि आईने हाताने पुसले. आम्ही जातीवंत, कट्टर मराठा आहोत, आम्ही शांत बसणार नाहीत. वेळप्रसंगी पोटाला बॉम्ब लावून बाकीच्यांना उडवून टाकू. मात्र मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, असा खणखणीत इशाराच कै.आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी दिला आहे. (Bomb the stomach; But let's take reservation: Narendra Patil)

श्री. पाटील म्हणाले, की मराठ्यांचा मुडदा पाडला. या काळात आम्ही चार लोक एकत्र आलो आणि चार मुडदे पाडले तर आम्ही कोणाच्या बापाला घाबरतोय का? असे म्हणत महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी ठराविक गटांनाच वेळ दिला. त्यावेळी आमदार विनायक मेटेंनी ही वेळ घेऊन आरक्षणाबाबत मुद्दे मांडले होते.

आरक्षण रद्द होताच, आम्हाला आमचा कार्यक्रम झाल्याचे समजले. जोपर्यंत आक्रमक होत नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही हे लक्षात आले आहे. मराठा चळवळीचे नेतृत्व छत्रपती संभाजी राजे, आमदार विनायक मेटे यांच्यासारखे अनेक मावळे करतात. जितके मावळे तिकका जास्त आवाज होतो. त्यामुळे ही लढाई एकत्र लढू असेही पाटील म्हणाले. ज्यांच्या बापाने समाजाचे काही केले नाही, अशा अशोक चव्हाण यांच्याकडे उपसमिती आहे. त्यांच्याऐवजी एकनाथ शिंदेंची निवड करण्याची मागणीही त्यांनी केली.

आता निकालाच विश्लेषण करण्यासाठी नेमलेल्या समितीमध्ये एकही मराठा नसून नेमलेले सगळे मराठा द्वेषी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मोर्चाला झालेल्या विरोधामुळेच गर्दी झाली, पाकीट घेऊन आंदोलन करणाऱ्यंना लाज वाटली पाहीजे, अशी टिकाही त्यांनी केली. तीन चाकी सरकारने आरक्षणाचे वाटोळे केले, त्यांचा सत्यानाश होणार, अशी टीका त्यांनी केली. 

नांदेडसह चार शहरांत आंदोलन

दरम्यान, यानंतर औरंगाबाद नंतर नाशिक व नांदेडलाही असेच मोर्चे काढणार असल्याचे विनायक मेटे म्हणाले. त्याउपरही सरकार बधले नाही तर मुंबईला आंदोलनचा इशाराही त्यांनी दिला.
 

हेही वाचा..

मराठा आरक्षण ः पुन्हा न्यायालयीन लढाईची तयारी

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख