अकोले : कोरोना काळात कुपोषणाचे प्रमाण कमी झाले असले, तरी पालकांमध्ये आवश्यक ती सतर्कता पाहण्यास मिळत नाही. त्यांनी सहकार्य केले व आपल्या बालकास दिलेला आहार नियमितपणे दिल्यास कुपोषण निश्चित थांबेल. यासाठीच अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यात तरुण अधिकारी सर्व परिस्थितीवर मात करून लढते आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी भारती साताळकर हे त्यांचे नाव.
अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पोषण आहार पोहचविण्यासाठी साताळकर अधिक आग्रही आहेत. राजूर भाग हा आदिवासी असून, डॉ. ए. पी. जी. अब्दुल कलाम अमृत आहार योजना कुपोषण कमी करण्यासाठी सुरु आहे. शासन निर्णयाप्रमाणे अंगणवाडी सेविकेने दिलेल्या तक्त्याप्रमाणे खरेदी करून लाभार्थ्यांना आहार पोचवायचा आहे. सरासरी बघितले, तर दर महिन्याला चार ते साडेचार हजार गरोदर महिला, स्तनदा माता सात महिने ते सहा वर्षापर्यंतचे बालके असून, त्यांना अंडी, कडधान्य, केळी, दूध दिले जाते. पर्यायी व्यवस्था म्हणून खजूर व राजगिरेचे लाडू देण्यात येतात. सध्या अंडी व केळी वाटप सुरु आहे. भाजीपाला, लिंबू, हळद, मिरची मसाले हे आहारात दिले जातात. अंगणवाडी सेविका हा आहार सध्या स्वतःच्या खर्चातून देतात व शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यावर त्यांच्या बँक खात्यावर तो निधी आम्ही वर्ग होते. त्यानंतर संबंधित दुकानदारांचे बिल जमा केले जाते.
अशा प्रकारे ही अमृताहार योजना आपल्या स्थरावर यशस्वीपणे सुरु आहे. राजूर विभागात २६२ अंगणवाडी सेविका आहेत. अंगणवाडी सेविका व मदतनीस कोरोनाच्या काळात सेवा देत आहे. आहाराचे प्रमाण पहिले, तर तीन ते सहा वयोगटातील मुलांना आहार अंगणवाडीमध्ये शिजवून दिला जायचा. कोरोनच्या कालावधीत तो कच्चा कोरडा आहार दिला जातो, तर अमृताहार आहार ही कच्चा व कोरडा दिला जातो. २६५ अंगणवाडीत ही योजना सुरु आहे. सेविका कोरोना काळात नियमितपणे सेवा देत आहेत. २ अंगणवाडी सेविका संक्रमण होऊन उपचार घेऊन पुन्हा कार्यरत झाल्या आहेत. कुपोषित व अतिकुपोषित विचार केला, तर तीव्र कुपोषित ६३ बालके आहेत. त्याच्यासाठी शासनाकडून सकस आहार म्हणून सकस पिठाचा पुरवठा होतो. त्यातून कुपोषणाचे प्रमाण कमी होते. कोरोनामध्ये सेविका पालकांचे व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्यांना कुपोषित व तीव्र कुपोषित मुले साधारण मध्ये कशी पाण्याचे त्याचे मार्गदर्शन करतात . मुलांना व कुटुंबाना स्वच्छतेचे पालन कसे करायचे हे सांगतात पालकांचे यात सहभाग व प्रबोधन महतवाचे आहे यातून निश्च्छितच कोरोना संक्रमण होण्यास मदत होईलच त्याबरोबर कुपोषणाचे प्रमाणही वेगाने कमी होईल, अशी आशा साताळकर यांनी व्यक्त केली.
Edited By - Murlidhar Karale

