जामखेड कोरोनामुक्तीसाठी `तहसीलदार विशाल नाईकवाडे पॅटर्न` ठरला निर्णायक

जामखेड तालुका कोरोनामुक्त होण्यासाठी झालेले प्रयत्न `तहसीलदार विशालनाईकवाडे पॅटर्न` म्हणून ओळखला जाऊ लागला. आमदार रोहित पवार यांचे मार्गदर्शन आणि तहसीलदारांचे नियोजन तालुका कोरोनामुक्तीसाठी कामे आले.
vishal naikwade
vishal naikwade

जामखेड : कोरोनाचे 17 रुग्ण सापडल्यामुळे सर्वात जास्त रुग्ण, अशी तालुक्याची ओळख राज्यभर होत असतानाच तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी योग्य नियोजन करून त्यावर मात केली. तालुका कोरोनामुक्त होण्यासाठी त्यांनी केलेले नियोजन म्हणजेच तहसीलदार विशाल नाईकवाडे पॅटर्न म्हणून ओळखला जाऊ लागला. आता पुन्हा रुग्ण वाढू नये म्हणून हे अधिकारी डोळ्यात तेल घालून आहेत. आमदार रोहित पवार यांचे मार्गदर्शन आणि तहसीलदारांचे नियोजन तालुका कोरोनामुक्तीसाठी कामे आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकामागे एक असे 17 रुग्ण जामखेड शहरात निघाले आणि येथील लोकसंख्येची घनता आणि मिळालेल्या रुग्णांची संख्या पाहता राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळणारे तालुक्याचे गाव, अशी जामखेडची ओळख सर्वदूर निर्माण झाली. त्यावेळी राज्यातील इतर गावांमध्ये कोरोनाच्यामुक्तीसाठी राबविलेले पँटर्न येथेही राबविण्याच्या सूचना झाल्या, मात्र ही ओळख अवघ्या दोन महिण्यात पुसण्याचे काम जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी स्तःचा पँटर्न राबवित पूर्ण केले.

नाईकवाडे यांनी जिल्हाप्रशासनाकडून प्राप्त झालेल्या सर्व सूचनांबरोबरच लोकप्रतिनिधी, नागरिक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन स्वतःची स्वतंत्र नियमावली बनविली. त्यामुळे कोरोनामुक्तीला यश आले. आता जामखेडमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण मिळायला नको, म्हणून तहसीलदार नाईकवाडे यांनी स्वतःची स्वतंत्र नियमावली पुन्हा तयार केली आहे. राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या चाकरमाण्यांसाठी चौदा दिवस क्वारंटाईन करण्यासाठी शहरातील शाळा,
महाविद्यालयाच्या इमारती ताब्यात घेऊन चोख व्यवस्था ठेवली आहे. याकरिता माध्यमिक व प्राथमिकच्या शिक्षकांना बंदोबस्तांसाठी ठेवले आहे. महसूल कर्मचाऱ्यांबरोबरच पोलिस पाटील, कोतवाल यांनाही कर्तव्यासाठी बोलवलेले आहे.  

पोलिसांच्या मदतीला सेवानिवृत्त सैनिकही रस्त्यावर

नाईकवाडे यांच्या संकल्पनेतून पोलिस, राज्य राखीव दलाचे पोलिस, होमगार्ड यांच्या बरोबरच आयुष्य भर देशसेवेसाठी लढणारे तालुक्यातील सेवा सेवानिवृत्त झालेले सैनिकांनाही बंदोबस्तासाठी सहभागी होण्याचे अवाहन त्यांनी केले. आपले 'कर्तव्य' निभावण्यासाठी तालुक्यातील दोन डझन सैनिक सेवेत दाखल झाले. नागरिकांनी लाॅकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे, बेफिकीरी होऊ नये, यासाठी काही तासांसाठी शहरात सुर झालेल्या अत्यावश्यक सेवेच्या दुकानांना विविध नियमावली राबविण्यावर भर दिला.

असा राबविला तहसीलदार विशाल नाईकवाडे पॅटर्न

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक हाॅटस्पाॅट कालवधी जामखेडला होता. या काळात नागरिकांना घरपोहच सेवाही सर्वाधिक देण्यात आली. दोनशे रुग्णांच्या विलगीकरण कक्षाची दोन ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था केली. अधिकारी-कर्मचार्यांमध्ये उत्तम समन्वय ठेवला. लोकप्रतिनिधींसह दानशूर व्यक्तींची मदत घेतली. संशयितांच्या सर्वाधिक तपासण्या करून घेतल्या. मास्क न वापरणे, रस्त्यावर थुंकण्याबाबत कारवाया केल्या.  सर्वांना विश्वासात घेऊन विविध एजन्सीच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग घेतला. कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी कौतुक केले. त्यामुळे मनोबल टिकवून ठेवण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले. गरजुंसाठी सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जामखेडमध्ये संपूर्ण लाॅकडाऊनच्या काळात 'अन्नछत्र' चालवले. नागरिकांच्या मताचा आदर ठेऊन योग्य ते स्विकारुन सुरळीत कामकाज केले. दररोजच्या कामकाजात अधिकाधिक सुधारणा आणि पारदर्शकता आणली. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना जामखेडमध्येच क्वारंटाईन केल्याने ग्रामीण भागात रुग्ण वाढू शकले नाहीत.

लोकांचा सहभाग महत्त्वाचा ः नाईकवाडे

जामखेड कोरोनामुक्तीसाठी आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न केले. परंतु अत्यंत कठिण परिस्थितीत लोकांनीही चांगला सहयोग दिला. लोकप्रतिनीधी, स्थानिक पदाधिकारी, सर्व अधिकारी तसेच नागरिकांच्या सूचनांचा विचार करून नियमावली करण्यात आली. त्यामुळे तालुका कोरोनामुक्त झाले. परंतु अजून धोका टळलेला नाही. ग्रामस्थांनी सतर्क राहिले पाहिजे. पुन्हा कोरोनाचा रुग्ण तालुक्यात सापडणार नाही, यासाठी प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी `सरकारनामा` शी बोलताना दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com