आमदार भालके आणि थोपटे यांच्यासाठी महाआघाडी सरकारचा पुन्हा विशेष आदेश

साखर कारखान्यांच्या कर्जाला थकहमी देण्याच्या धोरणामुळे सरकारसमोर आर्थिक संकट उभे राहत असल्याने ती देण्यासमुख्यमंत्री ठाकरे यांचा तत्ततःविरोध आहे.
mahaaghadi aadesh
mahaaghadi aadesh

पुणे : राज्य सरकारने आमदार भारत भालके आणि संग्राम थोपटे यांच्या साखर कारखान्यांना थकहमी देण्यासाठी पुन्हा विशेष आदेश काढला आहे. या कारखान्यांच्या कर्जांना द्यावयाच्या थकहमीची मुदत संपल्याने त्यांना आता पुन्हा पुढील सहा महिन्यांत कागदपत्रांची पूर्तता करून राज्य बॅंकेकडून कर्ज घ्यावे लागेल.

या दोन कारखान्यांना थकहमी देण्यावरून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाद झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अशी थकहमी देण्याच्या विरोधात होते. तरी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या दोन कारखान्यांना विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली होती. भालके यांच्या विठ्ठल कारखान्याला साठ कोटी रुपयांची तर थोपटे यांच्या राजगड कारखान्याला बारा कोटी रुपयांच्या कर्जाची हमी मिळणार आहे.

राज्य सहकारी बॅंकेने विनाशर्त थकहमीची मागणी सरकारकडे केली होती. म्हणजे ज्या क्षणी कारखान्याचे कर्ज थकीत होईल तशी त्याची भरपाई राज्य सरकारला करावी लागणार आहे. कारखान्याची मालमत्ता विकणे, संचालकांच्या मालमत्तेवर टाच आणणे अशा कायदेशीर मार्गातून कर्जाची रक्कम वसूल करण्याऐवजी थेट राज्य सरकारने त्वरेने ती रक्कम द्यावी, अशी अट नाबार्डने राज्य बॅंकेला घातली होती. ही अट सरकारला जाचक वाटत होती. त्यावरून कारखान्यांच्या कर्जाला थकहमी देण्यास विरोध होता. 

त्यासाठी नंतर सरकारने विशेष बाब म्हणून सहा महिन्यांपूर्वी आदेश जारी केला. मात्र त्या अवधीत या दोन कारखान्यांना कर्ज घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे पुन्हा आदेश काढण्यात आला आहे.

याबाबत `सरकारनामा`शी बोलताना भालके यांनी सांगितले की राज्य सहकारी बँकेकडून 60 कोटी रुपयांच्या कर्जापैकी तीस कोटी आधीच मिळाले आहे. कर्ज घेण्याची सहा महिन्यांची मुदत संपत होती म्हणून आणखी ती मुदत आणखी वाढवली आहे. साखर कारखान्यांना आर्थिक तोटा जर वर्षी बसू लागला आहे. साखरेचा उत्पादन खर्च व विक्री किंमत यात तफावत आल्याने कारखान्यांचा तोटा वाढत आहे. मिळणाऱ्या कर्जातून कारखान्याचा वाहतूक खर्च, कामगारांच्या पगार हे देण्यात येतील. संग्राम थोपटे म्हणाले की बारा कोटी रुपयांचे अल्पमुदत कर्ज मंजूर झाले आहे. त्यासाठीची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. याबाबत सरकारने फक्त नव्याने आदेश जारी केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com