`जयंत पाटील यांच्यापेक्षा मी जास्त तापट स्वभावाचा व कडक!`

महाविकास आघाडीत वाद नसल्याचे स्पष्टीकरण
Jayant Patil-Ajit Pawar
Jayant Patil-Ajit Pawar

मुंबई : जलसंपदामंत्री जयंत पाटील (Water resource minister Jayant Patil) हे गेले दोन-चार दिवस वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहेत. त्यांच्या खात्यात सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव विजयकुमार गौतम यांची नियुक्ती झाली. तसेच त्यांच्या खात्याच्या काही फाइल मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी वित्त विभागाकडे परत पाठविल्याने पाटील यांनी थेट मंत्रीमंडळ बैठकीतच कुंटे यांना धारेवर धरल्याचे सांगण्यात आले. जयंत पाटील हे अनुभवी मंत्री असल्याने त्यांच्याबद्दलच्या अशा वृत्तांमुळे राजकीय पटलावर चर्चा सुरू झाली आणि ते महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराज असल्याचे बोलले जाऊ लागले. त्याचे उत्तर आता पक्षाच्याही नेत्यांना देण्याची वेळ आली. (Jayant Patil not haapy with chief secretary) 

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar clarifies about Jayant Patil unhappines in cabinet meeting) यांनी याबाबत सविस्तर उत्तर देत कोरोना काळात अशा महत्त्व नसलेल्या  बातम्या टाळण्याचा सल्ला त्यांनी माध्यमांना दिला. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यातील कोरोना परिस्थितीची  आढावा घेण्यासाठी नेहमीची साप्ताहिक बैठक पार पडली. त्यानंतर पवार पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तर दिली.

त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने ते म्हणाले, “एक मिनिटं… हे माझ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षांच्या संदर्भात असेल, तर त्याचं उत्तर जयंत पाटीलच देतील. जयंत पाटील खूप वरिष्ठ नेते आहेत. अनेक वर्ष त्यांनी राज्याचं अर्थ मंत्रालय सांभाळलेल आहे.. गृह, ग्रामविकास खातं सांभाळलं. आता ते जलसंपदा मंत्रालय सांभाळतात. त्यांच्या कामाची पद्धत बघितली, तर ते अतिशय शांत स्वभावाचे आणि अधिकाऱ्यांकडून काम करून घेणारे आहेत. उलट जरा तापट स्वभावाचा कडक बोलणारा मीच आहे. ते तर एकदम माझ्याविरुद्ध आहेत. या बातम्या कशा आल्या, कधी आल्या माहिती नाही. ज्याला महत्त्व द्यायला नको, त्यालाच आपण महत्त्व देतोय. त्यामुळे लोकांच लक्ष तिकडे जातं. माझी सगळ्या माध्यमांना विनंती आहे की, यामध्ये काही तथ्य नाही. हा प्रशासनाचा भाग असतो. प्रशासनातील मुख्यमंत्री आणि मंत्री तसेच मुख्य सचिव आणि अधिकारी. आम्ही काही पहिल्यांदाच मंत्री झालेलो नाही, अनेक वर्ष आम्ही प्रशासन चालवलं आहे,”

संजय राऊत काय म्हणाले?

या वादावर आधी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनाही मुंबईत पत्रकारांनी छेडले होते. “कॅबिनेटमध्ये भांड्याला भांडे लागले असेल. पण आमची भांडी काचेची नाही ती फुटणार नाही किंवा त्याला तडा जाणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. दुसरीकडे जयंत पाटील यांनी, राजकीय जीवनात काम करताना कुणावरही नाराजी धरायची नसते. तसेच मंत्रिमंडळातील चर्चा ही बाहेर सांगण्याची प्रथा असते त्यामुळे मंत्रिमंडळातील चर्चा बाहेर सांगण्याची आवश्यकता वाटत नाही,” असे सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com