सरकारकडून पत्रकारांवर दडपशाही; 'भाजपयुमो'चा मंत्रालयावर मोर्चा - Repression of journalists by the government; BJP yuvamorcha's march on Mantralaya | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

सरकारकडून पत्रकारांवर दडपशाही; 'भाजपयुमो'चा मंत्रालयावर मोर्चा

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

आता नागरिकच सरकारला प्रश्न विचारू लागल्यावर आपली निष्क्रियता लपवण्यासाठी लोकांना तसेच प्रसारमाध्यमांना धमकावण्याचे सत्र सरकारने सुरु केले आहे. त्यांना वेगवेगळ्या प्रकारे कायद्याच्या कचाट्यात अडकवले जात आहे. त्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात आहे, असे तिवाना यांनी मोर्चासमोर बोलताना सांगितले. 

मुंबई : आपल्याला प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना महाविकास आघाडी सरकार धाकदपटशा दाखवत असल्याचा आरोप भाजयुमो चे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंह तिवाना यांनी केला आहे. त्याच्या निषेधार्थ भाजयुमो तर्फे आज मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी तिवाना यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

मात्र, सरकारच्या नाकर्तेपणावर प्रश्न करणे हा गुन्हा असेल तर मुंबई भाजयुमो चा प्रत्येक कार्यकर्ता तुरुंगात जाण्यास तयार आहे, असा इशाराही त्यांनी आज दिला. महाविकास आघाडीने सत्ता हाती घेतल्यावर फक्त सूडाचे राजकारण करून समाजमाध्यमांवर आपले खोटे स्तुतीपाठक उभे करण्याखेरीज काहीही केले नाही.

आता नागरिकच सरकारला प्रश्न विचारू लागल्यावर आपली निष्क्रियता लपवण्यासाठी लोकांना तसेच प्रसारमाध्यमांना धमकावण्याचे सत्र सरकारने सुरु केले आहे. त्यांना वेगवेगळ्या प्रकारे कायद्याच्या कचाट्यात अडकवले जात आहे. त्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात आहे, असे तिवाना यांनी मोर्चासमोर बोलताना सांगितले. 

सामान्य नागरिकांच्या घटनात्मक हक्कांचे उल्लंघन केले जात आहे, तसेच त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही घाला घातला जात आहे. महाविकास आघाडी सरकारचे पितळ उघडे पाडणारे रिपब्लिक समूहाचे प्रमुख अर्णब गोस्वामी व त्यांच्या टीमवरही असेच दडपण आणले जात आहे. पत्रकार व टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनने निषेध करूनही हे प्रकार थांबले नाहीत. समाजमाध्यमांवर सरकारविरोधी लिखाण करणाऱ्यांवरही पाळत ठेवली जात आहे, असाही आरोप तिवाना यांनी यावेळी केला.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख