गृहराज्यमंत्री पोहोचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर' - Minister of State for Home Affairs reaches farmers directly | Politics Marathi News - Sarkarnama

गृहराज्यमंत्री पोहोचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर'

अरूण गुरव
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

नैसर्गिक अडचणीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत. मी स्वतः आजच पाटण मतदारसंघातील बहुतांशी गावांत स्वतः जाऊन अतिवृष्टीमुळे भात, सोयाबीन, ऊस यासारख्या उभ्या तसेच मळणीसाठी तयार असलेल्या पिकांच्या नुकसानीची बांधावर जाऊन पाहणी केली.

मोरगिरी : पाटण मतदारसंघात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत महसूल, कृषी आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील अधिकारी होते. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी दिले. शेतकऱ्यांना दिलासा देताना मंत्री देसाई म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असून तातडीने भरपाई मिळण्याबाबत ही निर्णय घेतला जाईल.  
मंत्री देसाई यांनी पाटण मतदारसंघातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सांगवड, चोपडी, नाडे या परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पहाणी केली. यावेळी मंत्री देसाई म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांत मोठ्याप्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांची शेतात असणारी उभे पिके तसेच मळण्यासाठी काढून ठेवलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

अशा नैसर्गिक अडचणीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत. मी स्वतः आजच पाटण मतदारसंघातील बहुतांशी गावांत स्वतः जाऊन अतिवृष्टीमुळे भात, सोयाबीन, ऊस यासारख्या उभ्या तसेच मळणीसाठी तयार असलेल्या पिकांच्या नुकसानीची बांधावर जाऊन पाहणी केली.

अतिवृष्टीचा मोठा तडाखा पाटण मतदारसंघाला बसला आहे. या तालुक्यातील १३ महसूल मंडलापैकी ११ महसूल मंडलामध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सद्यपरिस्थितीत तालुक्यातील ३२५ पेक्षा जास्त गावे बाधित असून अंदाजे एक हजार ते दीड हजार हेक्टर क्षेत्र बाधित आहे. त्यासाठी पाटण मतदारसंघात तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून महसूल,कृषी आणि जिल्हा परिषद यंत्रणा पंचनामे करण्याचे काम  युद्धपातळीवर करीत आहे.

येत्या दोन दिवसांत नुकसानीचा नेमका अंदाज येईल. त्यामुळे नेमके किती नुकसान झाले हे स्पष्ट होईल. तसेच नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्यांना राज्य शासन मदत देण्यासाठी कटिबद्ध असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, गणेश भिसे तसेच महसूल, कृषी, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आजीला पाहून गृहराज्यमंत्री गाडीतून उतरले !

पाटण मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत असताना रस्त्यामध्ये अचानक एका वयोवृद्ध शेतकरी आजीला पाहून मंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीने आपल्या गाड्यांचा ताफा थांबविला. ते गाडीतून खाली उतरले आणि बाळकाबाई कोळी नावाच्या शेतकरी आजी जवळ जाऊन तिच्या शेतीचे किती नुकसान झाले आहे. यांची आस्थेवाईकपणे त्यांनी चौकशी केली. तसेच तिच्या शेतीची पाहणी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने त्या आजीच्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख