गांभीर्याने पंचनामे करा, कागदीघोडे सरकवू नका : शिवेंद्रसिंहराजेंची अधिकाऱ्यांना सूचना 

अतिवृष्टीमुळे सातारा आणि जावली मतदारसंघातील शेतकर्‍यांची भात, सोयाबीन यासह नाचणी, भुईमूग, ऊस आदी पिके नष्ट झाली आहेत. शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे योग्य पध्दतीने होऊन शेतकर्‍यांना शासनाची मदत मिळावी, यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
 Make serious inquiries, don't move paper horses says BJP MLA Shivendraraje's instruction to the authorities
Make serious inquiries, don't move paper horses says BJP MLA Shivendraraje's instruction to the authorities

सातारा : सातारा आणि जावली तालुक्यात पावसामुळे भात, सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच काही भागात नाचणी, भुईमूग, ऊस याही पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने ६५ मिलिमीटर पर्जन्यमानाचा निकष न लावता आणि प्रस्ताव तयार करुन पाठवायचाय म्हणून घाईगडबड न करता गांभीर्याने पंचनामे करावेत. पंचनामा करताना एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशी सक्त सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकार्‍यांना केली.

अतिवृष्टीमुळे सातारा आणि जावली मतदारसंघातील शेतकर्‍यांची भात, सोयाबीन यासह नाचणी, भुईमूग, ऊस आदी पिके नष्ट झाली आहेत. शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे योग्य पध्दतीने होऊन शेतकर्‍यांना शासनाची मदत मिळावी, यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

प्रत्यक्ष शेतात जावून शिवेंद्रसिंहराजे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि उपस्थित अधिकार्‍यांना पंचनामे करताना कोणीही वंचित राहू नये याबाबत सुचना केल्या. सातारा तालुक्यातील कण्हेर, वेळेकामथी, चोरगेवाडी आदी परिसरात पाहणी करताना त्यांच्यासमवेत जिल्हा परिषद सदस्य प्रतीक कदम, पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता इंदलकर, तहसिलदार आशा होळकर, सहायक गटविस्तार अधिकारी संजय ढमाळ, मंडल कृषी अधिकारी संतोष पवार, बी.एन. केवटे, ए.के. पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

जावली तालुक्यातील मोरावळे व परिसरातील पिक नुकसानीची पाहणीप्रसंगी तहसिलदार राजेंद्र पोळ, गट विकास अधिकारी सतीश बुध्दे, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांच्यासह मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, शेतकरी उपस्थित होते. ६५ मिलिमीटर पाऊस झाला असेल त्या भागातील पंचनामे करण्याचा शासनाचा निकष आहे. असे असले तरी अनेक गावांमध्ये ६५ मिलिमीटर पाऊस झाला नसला तरीही पाऊस, वादळी वार्‍यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

त्यामुळे शासनाचा हा निकष न लावता प्रशासनाने सर्वच नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत. सरकारने आदेश दिला म्हणून प्रस्ताव पाठवायचे म्हणून घाईगडबडीत कसेतरी पंचनामे करुन कागदी घोडे पुढे सरकवू नयेत, अशी सूचनाही शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित अधिकार्‍यांना केल्या. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com