शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळेल; पृथ्वीराज चव्हाण शेतकऱ्यांच्या बांधावर - Farmers will receive immediate compensation; Prithviraj Chavan on the field of farmers | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळेल; पृथ्वीराज चव्हाण शेतकऱ्यांच्या बांधावर

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

शेतकऱ्यांना आधार देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराड दक्षिणमधील अतिवृष्टीने बाधित जवळपास सर्व क्षेत्राचे पंचनामे झाले आहेत. काही पंचनामे राहिले आहेत का, हे तपासून मुख्य अहवाल शासनाकडे पाठविला जाईल. लवकरात लवकर शेतकऱ्यांना अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल.

कराड : कराड दक्षिण मधील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अतिवृष्टीने झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. लवकरात लवकर शेतकऱ्यांना अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल, असा दिलासा श्री. चव्हाण यांनी दिला. 

नुकताच माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण मधील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या परिस्थितीचा आढावा प्रशासनाकडून घेतला आहे तरी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बाधित क्षेत्राची पाहणी श्री. चव्हाण यांनी आज केली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रत्यक्ष भेटीने शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.

यावेळी शेतकऱ्यांना आधार देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराड दक्षिणमधील अतिवृष्टीने बाधित जवळपास सर्व क्षेत्राचे पंचनामे झाले आहेत. काही पंचनामे राहिले आहेत का, हे तपासून मुख्य अहवाल शासनाकडे पाठविला जाईल. लवकरात लवकर शेतकऱ्यांना अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल. त्याचबरोबर अतिवृष्टीने कुठे रस्ता व पूल खचले आहेत का, याचीसुद्धा पाहणी श्री. चव्हाण यांनी केली.

त्यानुसार अहवाल लवकरात लवकर बनवून शासनाकडे पाठवावा, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, कर्मचारी तसेच मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, युवानेते इंद्रजित चव्हाण तसेच पाचवड गावचे शेतकरी यावेळी उपस्थित होते. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख