माझ्या गाडीला हात लावयची नांगरे पाटलांची पण हिंमत नाही... - Case Register against shirala Taluka private Bus Owner | Politics Marathi News - Sarkarnama

माझ्या गाडीला हात लावयची नांगरे पाटलांची पण हिंमत नाही...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

विश्वास नांगरे पाटलांसह कुठल्या आरटीओची हिंमत नाही, माझ्या गाड्यांना हात करायची. वर्दीची तुला घमेंडी आहे का..., अशी धमकी देत ट्रॅव्हल्स मालक त्यांच्या अंगावरही धावून गेला. भर चौकात हा प्रकार सुरू होता. त्यामुळे नागरिकांची गर्दी झाली. यावेळी त्याने पोलिसांना धक्काबुक्की करण्याचा ही प्रयत्न केला.

कऱ्हाड : विश्वास नांगरे पाटील असो किंवा अन्य कोण... आरटीओसह कुणाचीच माझ्या गाडीला हात करायची हिंमत झाली नाही, अशी धमकी तालुका पोलिस ठाण्यातील महिला फौजदारास खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस व्यावसायकाने दिली. संबधिताने केवळ धमकी दिली नाही. तर तो त्या महिला अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेला. उंडाळे येथील भरचौकात प्रकार झाला असून याप्रकारामुळे खळबळ उडाली आहे.  

या प्रकरणी विजय चिंचोळकर (रा. राजंणवाडी, ता. शिराळा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार दीपज्योती पाटील यांनी त्याच्या विरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, रविवारी सायंकाळी उंडाळे येथे ट्रव्हल्स कंपनीच्या सहा बस उभ्या होत्या. त्यावेळी रयत साखर कारखान्याला जाणारे ट्रॅक्टर व आठवडी बाजारामुळे तेथे वाहतूक कोंडी होत होती.

त्याबाबत काही नागरिकांनी उंडाळे पोलिस दूरक्षेत्रच्या पोलिस उपनिरीक्षक दिपज्योती पाटील यांना माहिती दिली. त्यांनी तेथे येऊन ट्रॅव्हल्सचे मालक विजय चिंचोळकर यांना गाड्या बाजूला काढण्यास सांगितले. मात्र, चिंचोळकर यांनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरवात केली.

विश्वास नांगरे पाटलांसह कुठल्या आरटीओची हिंमत नाही, माझ्या गाड्यांना हात करायची. वर्दीची तुला घमेंडी आहे का..., अशी धमकी देत ट्रॅव्हल्स मालक त्यांच्या अंगावरही धावून गेला. भर चौकात हा प्रकार सुरू होता. त्यामुळे नागरिकांची गर्दी झाली. यावेळी त्याने पोलिसांना धक्काबुक्की करण्याचा ही प्रयत्न केला. त्याबाबत पोलिस उपनिरीक्षक दिपज्योती पाटील यांनी कऱ्हाड तालुका पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख