`गोकुळ`मध्ये मोठी घडामोड : आमदार प्रकाश आबिटकर हे मुश्रीफ-पाटील यांच्या आघाडीत - Prakash Abitkar joins hands with Hasan Mushriff and Satej Patil in Gokul election | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

`गोकुळ`मध्ये मोठी घडामोड : आमदार प्रकाश आबिटकर हे मुश्रीफ-पाटील यांच्या आघाडीत

सुनील पाटील
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

विरोधी आघाडीला मिळणार बळ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या निवडणूकीत आमदार प्रकाश आबिटकर हे विरोधी राजर्षी शाहू आघाडीसोबत राहणार आहेत. पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी हा निर्णय घेतला. आज-उद्या म्हणत अखेर आबिटकर यांनी विरोधी आघाडीला बळ देण्याची भूमिका घेतली. 

"शेतकऱ्यांच्या हितासाठी, दूध उत्पादकांच्या उत्पादनाला चार पैसे जास्त मिळावेत, हा उद्देश ठेवून गोकुळमध्ये सत्तारूढ गटाविरूध्द पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी "महाविकास आघाडी'च्या माध्यमातून मोट बांधली आहे. यामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तसेच जनसुराजशक्ती पक्षाह इतर घटक पक्षही सामील झाले आहेत. माजी आमदार सत्यजीत पाटील यांनी विरोधी शाहू आघाडीतून जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांच्या कार्यकर्त्यांनी शाहू आघाडीत भाजपमधील घटक पक्ष म्हणजेच जनसुराज्य शक्ती पक्ष असल्याने त्यांनी विरोधी आघाडीत जाण्यास नकार दिला होता.

दरम्यान, आमदार प्रकाश आबिटकर यांनीही आपल्या कार्यकर्त्यांचा विचार घेवून सत्तारूढ सोबत रहायचे की विरोधी आघाडीसोबत जायचे हा निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, आज रंगपंचमीदिवशीच श्री आबिटकर यांनी विरोधी शाहू आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधी आघाडी भक्कम होण्यास मदत झाली आहे. 

पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीमध्ये सहभाग असणाऱ्यांमध्ये आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील, अरुण डोंगळे, माजी आमदार के. पी. पाटील, गोकुळचे संस्थापक अध्यक्ष आनंदराव पाटील-चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील-चुयेकर व जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष ए. वाय. पाटील यांचा समावेश आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख