`शशिकांत, साताऱ्याची सभा होईल; असे पवार साहेबांनी विचारले...पण इतिहासच घडला!`

त्यादिवशी आम्ही शरद पवार यांच्यासोबत पाटणच्या सभेला गेलो होते. पाटणच्या सभेला थोडा उशीरच झाला. तेथेच पाऊस सुरू झाला होता. त्यावेळी पवार साहेबांनी साताऱ्याची सभा होईल का, याबाबत चिंता व्यक्त केली. तर दुसरीकडे साताऱ्यातून सातत्याने जिल्हाध्यक्ष सुनील मानेंसह कार्यकर्त्यांचे फोन येत होते. लोक मोठ्याप्रमाणात जमलेत, लवकर या, असे सांगत होते. त्यावेळी शरद पवार यांनी शशिकांत साताऱ्यातील सभा होईल का, असे विचारले. मी त्यांना सभा होईल, आपण तेथे जाऊ असे सांगितले.
NCP Rain Sabha and Shashikant shinde
NCP Rain Sabha and Shashikant shinde

सातारा : ``पाटणची सभा संपतानाच पाऊस सुरू झाला. त्यावेळी शरद पवार यांच्या मनात साताऱ्याची सांगता सभा कशी होईल, याविचाराने घालमेल सुरू झाली होती. पाटणवरून साताऱ्याकडे येतानाच मी साहेबांना सांगितले होते. साहेब काहीही होऊ देत, भाषण झाले नाही तरी चालेले. पण तुम्ही व्यासपीठावर येऊन जनतेला अभिवादन करावे. पण शरद पवार सभेच्या ठिकाणी आले व त्यांनी उपस्थित जनता व तरूणांतील उत्साह पाहिला अन् त्यांचे मन बदलले.  पाऊस सुरू असूनही पवार साहेब व्यासपीठावर आले. त्यांनी छत्री नाकारली अन्‌ धो पावसात भिजत जोशपूर्ण भाषण केले. या भाषणातूच त्यांनी आगामी परिवर्तनची बिजे रोवली,`` अशी आठवण राष्ट्रवादीचे पक्ष प्रतोद व आमदार शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यातील ऐतिहासिक सभेविषयी आज `सरकारनामा`शी बोलताना जागवली. 

शशिकांत शिंदे म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड, बारामतीची सभा करून साताऱ्याची सांगता सभा करायचे ठरविले होते. पण, त्यादिवशी निर्माण झालेले ढगाळ वातावरण पाहता साताऱ्याची सभा होईल का नाही, याबाबत शंका होती. आधी चार दिवसांपूर्वी भाजपची विभागीय सभा झाली होती. त्यामुळे साताऱ्याची राष्ट्रवादीची सभा यशस्वी करण्यासाठी आमचे जोरदार प्रयत्न सुरू होते.

त्यादिवशी आम्ही शरद पवार यांच्यासोबत पाटणच्या सभेला गेलो होते. पाटणच्या सभेला थोडा उशीरच झाला. तेथेच पाऊस सुरू झाला होता. त्यावेळी पवार साहेबांनी साताऱ्याची सभा होईल का, याबाबत चिंता व्यक्त केली. तर दुसरीकडे साताऱ्यातून सातत्याने जिल्हाध्यक्ष सुनील मानेंसह कार्यकर्त्यांचे फोन येत होते. लोक मोठ्याप्रमाणात जमलेत, लवकर या, असे सांगत होते. त्यावेळी शरद पवार यांनी शशिकांत साताऱ्यातील सभा होईल का, असे विचारले. मी त्यांना सभा होईल, आपण तेथे जाऊ असे सांगितले.

त्यानंतर पाटणमधून हायवेपर्यंत मी त्यांच्यासोबत गाडीतून आलो. त्यावेळी पवार साहेबांच्या मनात सुरू घालमेल होती. सभेला मोठ्यासंख्येने लोक जमले होते, पावसाचेही वातावरण झाले होते. साताऱ्यातील सभा कशी होणार याबाबत त्यांना चिंता वाटत होती. मी पाटणपासून हायवेपर्यंत साहेबांसोबत होतो. हायवेवर आल्यावर मी दुसऱ्या गाडीतून साताऱ्याकडे त्याच्यापुढे निघालो. साताऱ्यातील सभेच्या ठिकाणी आलो. त्यावेळी जिल्हा परिषदेचे मैदान खचखचून भरले होते. तेथे उपस्थित तरूण, युवक व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला होता.

मी व्यासपीठावर गेलो आणि जोशात भाषण करून तरूणांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत शरद पवार यांचे सभेच्या ठिकाणी आगमन झाले. पवारसाहेब आले आणि पावसाचे थेंब पडण्यास सुरवात झाली होती. मी साहेबांना येतानाच सांगितले होते. साहेब काहीही होऊ देत भाषण झाले नाही तरी चालेले. पण तुम्ही व्यासपीठावर येऊन अभिवादन करावे, असे ठरले. पण साहेबांनी लोकांतील व तरूणांतील उत्साह बघितला, त्यांचे मन बदलले. पाऊस सुरू असूनही पवार साहेब व्यासपीठावर आले.

त्यावेळी त्यांचा अंगरक्षक छत्री घेऊन धावत आला. साहेबांनी जनता भिजत असताना मी छत्री घेणार नाही, असे अंगरक्षकास सांगितले. त्यांनी पावसात भिजतच भाषण सुरू केले. त्यावेळी पवार साहेबांमधील उत्साह व आवेष मी पाहिला. त्यांनी जोशातच भाषण सुरू केले. 80 वर्षाचा योध्दा धो पावसात भिजत भाषण करत होता. समोर जनता त्याच जोशात पवार साहेबांचे भाषण ऐकत घोषणा देत होती. हे दृश्‍य पाहून आम्हीही सर्वजण धक्क झालो. पवार साहेबांनी भाषण केले आणि जनतेकडून शब्द घेतला. साहेबांचे भाषण संपले आणि पाऊस थांबला. 

सभेसाठी जमलेला जनसमुदाय पाहून साहेबांना जोश आला होता. त्यावेळी कुणालाही वाटले नव्हते, 80 वर्षाचा योध्दा धो पावसात भिजत जोशात भाषण करेल. पण तेथेच परिवर्तनाची बिजे शरद पवारांनी रोवली. पुढे निवडणुकीत परिवर्तन पहायला मिळाले. आजही आम्हाला या पावसातील सभेचा क्षण आठवला की आमच्या अंगात जोश संचारतो. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com