राणेंची जनआशीर्वाद यात्रा सुरळीत : भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

शिवसेनेच्या विरोधामुळे यात्रेपुढे आव्हान होते..
राणेंची जनआशीर्वाद यात्रा सुरळीत : भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
narayan rane

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची रत्नागिरीतील जनआशीर्वाद यात्रा (Janashirwad Yatra) गडबड, गोंधळ न होता पूर्ण झाली. भाजपचे (BJP) सुरेख नियोजन, टीमवर्क, कार्यकर्त्यांची फळी आणि प्रसंगी जशास तसे उत्तर देण्यासाठी तयारी, यामुळे भाजपची ताकद दिसून आली. याकरिता द. रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन व पदाधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरली, याची दखल घेत, मंत्री राणे यांनी रत्नागिरीतून पुढे जाताना अॅड. पटवर्धन व टीमचे कौतुक केले.

शिवसेनेचा विरोध, राणे यांना झालेली अटक, महाड न्यायालयात जामीन या साऱ्‍या घडामोडीत तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. परंतु भाजपच्या सर्व कार्यकारिणीने घेतलेल्या नियोजनबद्ध कार्यक्रम केला. नारायण राणे, नीलेश राणे व नीतेश राणे यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे जनआशीर्वाद यात्रा यशस्वी झाली. यातून भाजपच्या कार्यकर्त्यांना उर्जा मिळाली आहे.

अटक, जामीन, भाजपचे फाडलेले बॅनर्स आणि पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द झाल्यामुळे रत्नागिरीत भाजपचे पदाधिकारीही आक्रमक झाले होते. बदललेल्या दौऱ्याचे सूत्रबद्ध पद्धतीने नियोजन करण्याचे काम जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी केले. त्याकरिता रणनीती आखली. पोलिस अधिकाऱ्‍यांसमवेत महत्त्वाची बैठक घेतली. रत्नागिरीच्या कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही, अशा पद्धतीचे नियोजन आणि प्रत्येक पदाधिकाऱ्ं‍यावर दिलेली जबाबदारी, ती जबाबदारी पूर्ण होतेय की नाही, याची क्षणाक्षणाला माहिती ठेवली.

तीस संस्थांची भेट, निवेदन
भाजप कार्यकर्त्यांसह समाजातील सर्व स्तरांतील लोकांनी येऊन मंत्री राणे यांची भेट घेतली पाहिजे, याकरिता मच्छीमार, सीए, इंडियन मेडिकल असेसिएशन, रत्नागिरी जिल्हा बार असोसिएशन (वकिल संघटना), मांडवी पर्यटन संस्था यांच्यासमवेत सुमारे ३० संस्थांच्या शिष्टमंडळ, पदाधिकाऱ्यांना अॅड. पटवर्धन यांनी वेळ भेट दिली. त्यानंतर भाजप कार्यालयात कार्यक्रमानंतर मंत्री राणे यांची भेट घेत या सर्व संस्थांनी निवेदन सादर केली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in