मोदी-शहांना कोरोनापेक्षा ममता बॅनर्जींना हरविण्यात रस 

महाष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर टिका करताना आपण राज्याचा अपमान करत आहोत, याचे भान देखील मुंबईचे असलेले गोयल यांना नसावे याचे आश्चर्य वाटते.
Ncp Leader Hasan Mushrif- Modi- Saha News Kolhapur
Ncp Leader Hasan Mushrif- Modi- Saha News Kolhapur

कोल्हापूर : देशात कोरोना रुग्ण वाढत आहेत, ऑक्‍सिजन, रेमडिसिव्हर व लस मिळत नसल्याने लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. तरीही, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाला हरवण्यापेक्षा पश्‍चिम बंगालमधील निवडणूकीत ममता बॅनर्जींना हरविण्यात रस असल्याची टीका कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

भाजपने ऑक्‍सिजन, रेमडिसिव्हर व लसीवर कंट्रोल ठेवल्यामुळे कोरोनामुळे लोकांचा मृत्यू होत आहे. तसेच, रेल्वे आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबबत केलेल्या वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. अशा शब्दांत मुश्रीफ यांनी गोयल यांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेत निषेध केला.

मुश्रीफ म्हणाले, गोयल यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे केंद्र सरकासोबत समन्वय ठेवून आहेत. कोरोनासारख्या महामारीत राजकारण येवू नये अशी मुख्यमंत्री ठाकरे यांची भूमिका आहे. पियुष गोयल यांची सत्तेची दुसरी फेरी आहे. ते देशाचे रेल्वेमंत्री आहेत. त्यांच्याकडे वाणिज्य पदाचा भार आहे, शिवाय ते महाराष्ट्रातील विद्वान गृहस्थ आहेत.

पण ग्रामीण भागात नेऊन हे कोण असे विचारले तर पाच माणसही गोयल यांना ओळखणार नाहीत. त्यांना कुणी ओळखले तर मी तुम्ही द्याल ती शिक्षा भोगणयास तयार आहे, असा टोलाही मुश्रीफ यांनी यावेळी लगावला.  महाष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर टिका करताना आपण राज्याचा अपमान करत आहोत, याचे भान देखील मुंबईचे असलेले गोयल यांना नसावे याचे आश्चर्य वाटते. महाराष्ट्रातले असूनही ते राज्याशी संपर्क ठेवत नाही, उलट राज्याची बदनामीच करतात, असा आरोपही त्यांनी केला. 

ब्रुक फार्मावर पोलीस कारवाई झाली म्हणून देवेंद्र फडणवीस पोलीस ठाण्यातच जाऊन बसले. त्यांनी असले घाणीरडे राजकारण बंद करावे. सरकार अस्थिर होत नाही म्हणनूच त्यांचे हे सर्व खेळ सुरु आहेत. ऑक्‍सिजनसाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे गुजरात व मध्यप्रदेशात महाराष्ट्रापेक्षा अधिकची कोरोना लस दिली जात असल्याचे सांगत  हे राजकारण थांबवले पाहिजे असेही मुश्रीफ म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com