महाडिक बाप नव्हे जिल्ह्याचा ताप : खासदार संजय मंडलिक - Mahadik is not father figure but adversaries says sanjay Mandlik | Politics Marathi News - Sarkarnama

महाडिक बाप नव्हे जिल्ह्याचा ताप : खासदार संजय मंडलिक

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 25 एप्रिल 2021

खासदार संजय मंडलिक यांची जहरी टीका

सरवडे : जिल्ह्याचा बाप स्वतःला ते समजतात, ते बाप नाहीत तर अखंड जिल्ह्याचा ते ताप आहेत, हा ताप राधानगरीकर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, गोकुळ लुटण्याचे काम ते करत आहेत, त्यांची टॅंकरगिरी थांबवा, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी महादेवराव महाडिक यांना लगावला.

अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथे विरोधी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या ठराव धारकाच्या सभेत ते बोलत होते.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, "माजी खासदार धनंजय महाडिक म्हणतात महाडिक यांचा गोकुळमध्ये एकही टॅंकर नाही. मात्र महादेवराव महाडिक सांगतात "गोकुळ'ला माझे 40 टॅंकर आहेत. तुमच्यात ताळमेळ नाही. दर महिन्याला टॅंकरचे 80 लाख रुपये मिळतात. म्हणून त्यांचे तारखेकडे लक्ष असते. मल्टीस्टेट थांबल्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे अस्तित्व टिकून आहे ''.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले,"" गेल्यावेळी त्यांना पाठिंबा देऊन आम्ही चूक केली. नोकरभरती आणि पशुखाद्यासाठी घेतलेल्या मोलॅशीसमध्ये भ्रष्टाचार केला.''

महादेवराव महाडिक यांनी आपण बाप असून सर्वांना पुरून उरणार असल्याचे सांगितले होते. त्याला संजय मंडलिक यांनी आक्रमक उत्तर दिले. 

अभिजित तायशेट्ये यांनी स्वागत केले. अरुण डोंगळे, प्रकाश आबिटकर, ए. वाय. पाटील, विजयसिंह मोरे, किसन चौगले, के. पी. पाटील, सुजित मिणचेकर, धैर्यशील पाटील, वसंतराव पाटील, नंदकिशोर सूर्यवंशी, सदाशिव चरापले, नेताजी पाटील, रमेश वारके, फिरोजखान पाटील उपस्थित होते. अशोक फराकटे यांनी आभार मानले.

हे पण वाचा : गोकुळ निवडणूकीबाबत शासन म्हणने मांडणार

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या निवडणूक घ्यावी की नको याबाबत शासनाकडून उद्या म्हणने मांडले जाणार आहे. गोकुळ व काही दूध संस्थांनी कोरोनामुळे गोकुळची निवडणूक रद्द करावी अशी मागणी केली होती. यावर न्यायालयाने शासनाकडे म्हणने मांगितले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अनेक ठरावदारांचे कोरोनामूळे मृत्यू झाला आहे. काहींना उपचार सुरु आहेत. अशामध्ये राज्यात इतर सहकारी संस्थांची निवडणूक रद्द झाली असताना गोकुळच्या निवडणूकीसाठी हट्टाहास कशासाठी अशी याचिका सत्तारुढ व काही दूध संस्थांनी उच्च न्यायालयात केली आहे. यावर उच्च न्यायालयाने राज्य शासनाने म्हणने मागितले आहे. यावर उद्या हे म्हणून दिले जाणार आहे. यावरच निवडणूक होणार किंवा नाही, हा फैसालही होवू शकतो. गोकुळसाठी 2 मे ला मतदान होत आहे. त्यामुळे सत्तारूढ आणि विरोधी पॅनेलकडून जोरदार प्रचार सुरु झाला आहे. ठरावदारांचे मेळावेही घेतले जात आहेत. अशामध्ये निवडणूक योग्य आहे. का असाही सवाल याचिकाकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, उद्या या याचिकेवर सरकारचे म्हणने मांडले जाईल. त्यानंतर यावर निर्णय घेतला जावू शकतो.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख