`गोकुळ`साठी मतदान होणार की नाही, टांगती तलवार कायम - hearing on PIL to postpone gokul election in supreme court cancelled today | Politics Marathi News - Sarkarnama

`गोकुळ`साठी मतदान होणार की नाही, टांगती तलवार कायम

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 26 एप्रिल 2021

न्यायालयातील सुनावणी टळली...

कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीला स्थगिती मिळावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी आज झाली नाही. सर्वोच्च न्यायालयातील एका न्यायाधीशांचे काल कोरोनामुळे निधन झाल्याने आजची ही सुनावणी पुन्हा लांबणीवर टाकली.

"गोकुळ'च्या दोन संस्थांकडून ही याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारने राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 31 ऑगस्ट 2021 पर्यंत स्थगिती दिली आहे. तथापि उच्च न्यायालयाच्या 10 फेब्रुवारीच्या आदेशानुसार "गोकुळ'ची प्रक्रिया सुरूच आहे. उच्च न्यायालयातील अंतिम सुनावणीवेळी राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून राज्य सरकारने या निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने देऊन याचिका फेटाळली होती. आता दोन संस्थांनी राज्य सरकारने नव्याने काढलेल्या आदेशालाच सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. 19 एप्रिलला झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला 26 एप्रिलपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. राज्य सरकारकडून हे म्हणणे सादर केल्याचे समजते, तथापि न्यायाधीशांच्या निधनामुळे आजची सुनावणीच पुढे ढकलली. आता ही सुनावणी उद्या (ता. 27) किंवा बुधवारी होण्याची शक्‍यता आहे.

ठरावदार मात्र सहलीवर
एकीकडे नेत्यांच्या प्रचार सभा सुरू असताना त्यातील आरोप-प्रत्यारोप ऐकायला ठरावदार मात्र नाहीत. बहुतांश ठरावदारांना दोन्ही आघाड्यांकडून सहलीवर पाठवले जात आहे. त्यामुळे ठरावदार नसताना होत असलेल्या टीका चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

या पण बातम्या वाचा : महाडिक यांची संपत्ती आहे तरी किती?

बावड्याचे पाटील, शिळ्या कढीला किती ऊत : शौमिका महाडिकांचा टीका

शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्यांनी महाडिकांच्या व्यवसायावर बोलू नये...

मी सर्वांचा बाप, पुरून उरणार : महाडिक गरजले....

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख