तेव्हाचे संभाजीराजे, सतेज, मुन्ना, चंद्रदीप पुन्हा असे एकत्र दिसतील? - Discuss the photo and the person in it | Politics Marathi News - Sarkarnama

तेव्हाचे संभाजीराजे, सतेज, मुन्ना, चंद्रदीप पुन्हा असे एकत्र दिसतील?

निवास चौघुले
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

हा फोटो किती वर्षापुर्वीचा आहे याची माहिती नाही पण त्यात खासदार संभाजीराजे हे वाढदिवसाचा केक कापत असताना त्यांच्या उजव्या बाजूला माजी खासदार धनंजय महाडीक तर डाव्या बाजूला माजी आमदार चंद्रदीप नरके, गृहराज्यमंत्री सतेज पाटील व संभाजीराजे यांचे धाकटे बंधू माजी आमदार मालोजीराजे असे क्रमाने उभे आहेत. या सर्वांचा हा ऐन उमेदीतील फोटा आहे.

कोल्हापूर ःएक राज्यसभा सदस्य, एक माजी खासदार, विद्यमान गृहराज्यमंत्री, दोन माजी आमदार आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा एकत्रित फोटो सद्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. अर्थात याला निमित्त आहे ते खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या आज होत असलेल्या वाढदिवसाचे आणि त्यात हा फोटो जुना असला तरी तो त्यांच्याच वाढदिवसाचा आहे. एकेकाळी या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या या दिग्गज राजकीय नेत्यांच्या आजच्या राजकीय वाटा मात्र वेगवेगळ्या झाल्या आहेत.

हा फोटो किती वर्षापुर्वीचा आहे याची माहिती नाही पण त्यात खासदार संभाजीराजे हे वाढदिवसाचा केक कापत असताना त्यांच्या उजव्या बाजूला माजी खासदार धनंजय महाडीक तर डाव्या बाजूला माजी आमदार चंद्रदीप नरके, गृहराज्यमंत्री सतेज पाटील व संभाजीराजे यांचे धाकटे बंधू माजी आमदार मालोजीराजे असे क्रमाने उभे आहेत. या सर्वांचा हा ऐन उमेदीतील फोटा आहे, त्यातही या सर्वांचा त्यावेळचा पोषाख बघितला तर "कॉलेज लाईफ' चा फिल त्यात आहे.

सतेज पाटील यांनी जीन्स पॅंटवर घातलेला पांढरा शुभ्र शर्ट, पांढरा बेल्ट आणि पायात पांढरा शूज लक्ष वेधून घेतो. हे सर्वजण एकेकाळचे जीवलग मित्र. विद्यापीठाच्या निवडणुकीपासून राजकारणाचे धडे या सर्वांनीच गिरवले. त्यानंतर कोण लोकसभेत तर कोण विधानसभा, राज्यसभेत पोहचला पण त्या काळात एकत्र असलेल्यांच्या राजकीय वाटा मात्र वेगळ्या झाल्या.

महाडिक राष्ट्रवादीतून खासदार झाले आणि आता भाजपात आहेत. नरके मूळचे कॉंग्रेसच्या विचारसरणीचे पण पर्याय नसल्याने शिवसेनेत गेले आणि सलग दोनवेळा सेनेचे आमदार झाले. मालोजीराजे मुळचे राष्ट्रवादीत पण निवडणुकीच्या आदल्या दिवशी त्यांचा कॉंग्रेस प्रवेश झाला आणि शहरातून ते कॉंग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. सतेज पाटील यांनी विधानसभेची पहिली निवडणूक अपक्ष लढवून जिंकली पण पाठिंबा कॉंग्रेसला दिला, तेव्हापासून ते कॉंग्रेसमध्येच आहेत.

काळाच्या ओघात महाडीक-सतेज पाटील यांच्यात राजकीय वाद सुरू झाला. मालोजीराजे हेही राजकारणापासून अलिप्त राहीले. संभाजीराजे यांना राष्ट्रपतीच्या कोट्यातून खासदारकी मिळाली तर श्री. नरके हे नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले. पण या सर्वांचा त्या काळातील एकत्रित फोटो मात्र चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मिडीयावर या फोटोचीच चर्चा जास्त आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख