राज्याने पूरग्रस्तांना केलेली मदत ही मलमपट्टी..

महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये यंदा महापुराने मोठे नुकसान झाले आहे.
राज्याने पूरग्रस्तांना केलेली मदत ही मलमपट्टी..
Rsp Leader Mahadev Jankar News sangali

सांगली ः महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या पॅकेजमध्ये आणखी वाढ करावी, अशी मागणी माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली आहे. (The bandage is the help given by the state to the flood victims.) तसेच ही मदत पुरेशी नसून मलमपट्टी करणारी आहे, केंद्र सरकारनेही आणखी मदत केली पाहिजे, असेही जानकर  म्हणाले.

सांगली जिल्ह्यातल्या बहे या ठिकाणी पूरग्रस्त  भागाची पाहणी जानकर यांनी केली, यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.  वाळवा तालुक्यातील बहे येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करत जानकर यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला.  (Rsp Leader Mahadev Jankar Visit Flood afected Sangli District)  महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये यंदा महापुराने मोठे नुकसान झाले आहे. यातून पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभे करण्यासाठी राज्य सरकारकडून भरीव मदत दिली पाहिजे.

राज्य सरकारने ११ हजार ५०० कोटी मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे, मात्र हे पुरेसं नाही, मलमपट्टी करणारी ही मदत आहे. त्यामुळे त्याहीपेक्षा अधिक मदतीची गरज आहे, केंद्र सरकारने साडे सातशे कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. मात्र नुकसान मोठे असल्याने केंद्रानेही राज्याला अधिकची मदत द्यावी, अशी मागणीही महादेव जानकर यांनी केली.

मुख्यमंत्री आणि केंद्राला याबाबत अहवाल पाठवणार असल्याचेही जानकर यांनी सांगितले. कोयना धरणाचे अतिरिक्त पाणी समुद्रात वाहून जाते,.ते राज्य सरकारने पाईपलाइनद्वारे कोकणात आणि दुष्काळी भागात वळवावे, जेणेकरून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आणि कोकणातून स्थलांतरित होणाऱ्या तरुणांना त्याचा फायदा होईल, असेही जानकर म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in