आरटीओत नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणीला सव्वा कोटींचा गंडा

त्यावेळी रणवरे यांनी योगिता गुंजवटे यांना तुम्ही ॲटोमोबाईल डिप्लोमा केला असताना इथे का नोकरी करता, असे बोलत माझी चांगली ओळख असून मी तुमचे आरटीओ ऑफिस पुणे येथे काम करतो. थोडे पैसे जातील. परंतु नोकरी नक्की लागेल असे सांगितले. यानंतर रणवरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर गुंजवटे त्यांना पैसे देण्यास तयार झाल्या.
Woman Cheated By Youth
Woman Cheated By Youth

फलटण शहर : शासनाच्या आरटीओ खात्यात नोकरीस लावतो असे आमिष दाखवून तरुणी व तीच्या वडिलांची फसवणूक करुन त्यांना तब्बल सव्वा कोटी रुपयांचा चुना लावल्याप्रकरणी एकास फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे. प्रमोद हरीचंद्र रणवरे (रा. मलठण, फलटण) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याबाबत फलटण शहर पोलिस ठाण्यात झिरपवाडी (ता. फलटण) येथील योगिता शिवाजी गुंजवटे (वय 35) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, 2009 मध्ये त्या फलटण येथील एका दुचाकी गाड्यांच्या शोरुममध्ये काम करीत असताना तेथे काम करणाऱ्या प्रमोद रणवरे याच्याशी त्यांची ओळख झाली होती.

त्यावेळी रणवरे यांनी योगिता गुंजवटे यांना तुम्ही ॲटोमोबाईल डिप्लोमा केला असताना इथे का नोकरी करता, असे बोलत माझी चांगली ओळख असून मी तुमचे आरटीओ ऑफिस पुणे येथे काम करतो. थोडे पैसे जातील. परंतु नोकरी नक्की लागेल असे सांगितले. यानंतर रणवरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर गुंजवटे त्यांना पैसे देण्यास तयार झाल्या.

यानंतर प्रमोद रणवरे याने पाच लाखाची मागणी करीत कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगितले. दिनांक 13 मार्च 2009 मध्ये रणवरे यास 75 हजार रुपये रोख दिल्यानंतर त्यांनी सहा महिन्यांमध्ये तुमची ऑर्डर निघेल असे सांगितले. त्यानंतर 2009 ते 2014 या दरम्यान नोकरी लावतो, असे सांगत वेळोवेळी रोख स्वरुपात एक कोटी 25 लाख रुपये घेतले.

एवढी मोठी रक्कम देण्यासाठी गुंजवटे यांच्या वडिलांनी 12 एकर शेती वेळोवेळी विकली व फलटण येथील फ्लॉटही विकला. तसेच नातेवाईकांचे सोने गहाण ठेऊन सात लाख रुपये कर्ज व नातेवाईकांकडूनही पैसेही घेतले. त्या दरम्यान प्रमोद रणवरे याने माझी पुणे परिवहन मंडळ पुणे मध्ये पिंपरी-चिंचवड येथे निवड झाली असुन 14 जानेवारी 2011 मध्ये तेथे हजर राहाण्याचे पत्र पोस्टाने मला पाठविले.

परंतू तेथे मी हजर होण्यास गेले असता साहेब बाहेर गेलेत, त्यांनी बोलाविल्यावर येऊ असे सांगुन परत फलटण येथे आलो. त्यानंतरही अशीच पत्रे रणवरे यांनी पोस्टाने पाठविली तेव्हा रणवरे सोबत आम्ही तेथे हजर रहात होतो.  पाच वर्ष होऊनही नोकरी न मिळाल्याने योगिता गुंजवटे यांनी श्री. रणवरे यास पैसे मागण्यास सुरुवात केली. वारंवार मागणी केल्यानंतर रणवरे यांनी 16 मार्च 2014 रोजी ॲक्सिस बँकेचा पन्नास लाख रुपयांचा चेक दिला.

परंतू थोड्या दिवसाने रोख पैसे देतो असे सांगून तो चेक ही परत घेतला. लोकांची देणी झाल्याने तणावात डिसेंबर 2014 मध्ये योगिता गुंजवटे यांच्या वडिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. तरीही 2018 पर्यंत श्री. रणवरे यानी पैसे दिले नाहीत. जानेवारी 2019 मध्ये श्री. रणवरे यांच्याविरोधात फलटण शहर पोलिस ठाण्यात अर्ज दिल्यानंतर मी चेक देतो, असे सांगून सहा महिन्यांची मुदत श्री. रणवरे यानी मागितली.

त्यानंतर 13 फेब्रुवारी 2019 रोजी केलेल्या नोटरीत श्री. रणवरे यांनी योगिता गुंजवटे यांच्याकडून एक कोटी 25 लाख रुपये घेतले असून त्या बदल्यात 62 लाख 50 हजार रुपयांचे दोन चेक दिले. परंतू ते दोन्ही चेक 27 ऑगस्ट 2019 रोजी बँकेत भरले. परंतू ते वटलेले नाहीत. त्यामुळेच रणवरे यांनी नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याची तक्रार योगिता गुंजवटे यांनी दाखल केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरिक्षक श्री. राऊळ करीत आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com