वडणेरे समिती अहवालात पुराच्या कारणांचा उल्लेखच नाही : शंभुराज देसाई

पाणी पातळी मर्यादीत ठेवण्यासाठी कोयना धरणातून पाणी सोडले पाहिजे. ते सोडल्यावर पुरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी त्या ताकारी आणि टेंभू दोन योजनांनी पाणी उचलले पाहिजे, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले. त्यावर जलसंपदा मंत्री पाटील यांनी यावेळी संबंधित मुद्या्ंचा त्यामध्ये समावेश करण्याची गरज आहे, असे सांगितले.
Minister shambhuraj desai
Minister shambhuraj desai

कऱ्हाड : वडणेरे समितीच्या अहवालात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पुराची कारणमिमांसा काढली आहे. मात्र, सांगलीला जो पूर येतो त्याचे महत्वाचे कारण कऱ्हाडला येणारे पाणी आहे. कोयना धरणातून एक ते सव्वा लाख क्युसेक पाणी सोडले जाते. त्यावेळी पावसाचे पाणी आणि कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नदीला पूर येतो, ही वस्तुस्थिती असताना वडणेरे समिताने त्याचा काहीच उल्लेख आपल्या अहवालात केलेला नाही, असा आरोप गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी आज जलसंपदा मंत्र्यांच्या समोरच केला.

त्यावर वडणेरे समितीचे प्रमुख श्री. वडनेरे यांनी यावर्षी धरणातून पाणी सोडण्याचे वेगळे पध्दतीने करायचे नियोजन प्रस्तावित केलेले आहे, असे सांगितले. सातारा, सांगली व कोल्हापुरला येणाऱ्या महापुराच्या पार्श्वभूमीवर वडणेरे समितीच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

त्यामध्ये गृहराज्यमंत्री देसाई यांनी हा आरोप केला. खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कोल्हापुरचे पालकमंत्री बंटी पाटील, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह तिन्ही जिल्ह्यांचे लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी उपस्थित होते.

मंत्री देसाई म्हणाले, वडणेरे समितीच्या अहवालात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पुराची कारणमिमांसा काढली आहे. मात्र सांगलीला जो पूर येतो त्याचे महत्वाचे कारण कऱ्हाडला येणारे पाणी आहे. कोयना धरणातुन एक ते सव्वा लाख क्युसेक पाणी सोडले जाते.  पावसाचे पाणी आणि धरणातून सोडलेले पाणी यामुळे कोयनानगरपासुन कऱ्हाडपर्यंत नदीपात्र सोडून गावात पाणी शिरते.

 कोयनेचे येणारे पाणी आणि कृष्णा नदीचे येणारे पाणी यामुळे कऱ्हाडला पूर येतो. ही वस्तुस्थिती असताना वडणेरे समिताने त्याचा काहीच उल्लेख अहवालात केलेला नाही. ते पाणी कसे कमी करायचे, धरणातील पाणी पातळी कशी मर्यादीत ठेवायची, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागणार नाही असा मुद्दा मांडला. त्यावर वडणेरे समितीचे प्रमुख श्री. वडनेरे यांनी यावर्षी धरणातून पाणी सोडण्याचे वेगळे पध्दतीने करायचे नियोजन प्रस्तावित केलेले आहे.

ते नेमकं कसं नियंत्रित ठेवणार हा प्रश्न आहे. यंदा गेल्यावर्षीपेक्षा 15 टीएमसी पाणी जास्त आहे. जुन महिन्यातील पहिल्या 20 दिवसांतील पावसाची आकडेवारी पाहिल्यास धरण परिसरात झालेला पाऊस गेल्यावर्षीपेक्षा पाचपट जादा आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्याचा प्रश्न आहेच. त्याचबरोबर ताकारी आणि टेंभू या मोठ्या उपसा सिंचन योजना या जुनपर्यंतच चालवल्या जातात.

पाणी पातळी मर्यादीत ठेवण्यासाठी कोयना धरणातून पाणी सोडले पाहिजे. ते सोडल्यावर पुरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी त्या ताकारी आणि टेंभू दोन योजनांनी पाणी उचलले पाहिजे, असे सांगितले. त्यावर जलसंपदा मंत्री पाटील यांनी यावेळी संबंधित मुद्या्ंचा त्यामध्ये समावेश करण्याची गरज आहे, असे सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com